पुरस्कार मिळविणाऱ्या मेढ्यात स्वच्छतेकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:52 PM2018-11-21T22:52:37+5:302018-11-21T22:52:41+5:30
मेढा : ‘शासनाचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळविणाºया मेढा नगरपंचायतीने स्वच्छतेकडेच दुर्लक्ष केल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील बाजारपेठेत कचºयाचे ...
मेढा : ‘शासनाचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळविणाºया मेढा नगरपंचायतीने स्वच्छतेकडेच दुर्लक्ष केल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील बाजारपेठेत कचºयाचे ढीग साठल्याने व दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली असून, कचºयाचे ढीग त्वरित हटावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढा शहराचे ग्रामपंचायतमधून नगरपंचायतीत रुपांतर झाले आणि नागरिकांना सुविधा निर्माण होतील, अशी आशा निर्माण झाली. मात्र, गेल्या २ वर्षांत मेढा नगरपंचायतीची संथ गतीने चाललेली वाटचाल पाहून नागरिकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेढा शहरात मध्यंतरीच्या काळात कचºयाची घंटागाडी बंद होती. सध्या ती सुरू झाली असली तरी शहरातील कचºयाची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे कचºयाचे ढीग बाजारपेठेत तसेच पडून आहेत. जावळी तहसील कार्यालयाकडे जाणाºया रस्त्यानजीक असलेल्या रेव्हेन्यू क्लबजवळ ओल्या व सुक्या कचºयाचा ढीग गेले काही दिवस पडून आहे, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीला तोंड देत नाक मुठीत धरून जावे लागत आहे. मेढा शहरातील गटारे तर गेल्या अनेक दिवसांत साफ न केल्याने दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांनी नगरपंचायतीच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नगरपंचायतीकडून घंटागाडीतून नेला जाणाºया कचºयाची देखील विल्हेवाट लावली जात नाही. हा कचरा स्मशानभूमीनजीक उघड्यावर टाकल्यामुळे वेण्णा नदीचा परिसर देखील दुर्गंधीमय झाला आहे. स्मशानभूमी, जावळी तहसील कार्यालय, येथील कचºयाचे ढीग, स्वच्छ न केलेली गटारे, यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपंचायतीला २ वर्षे स्वच्छतेचा पुरस्कार कोणत्या निकषावर मिळाला, या पुरस्कारासाठी ज्या शासकीय अधिकाºयांनी कागदी घोडे नाचवले, त्याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.