पाडेगावमध्ये नियमबाह्य कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:16+5:302021-06-24T04:26:16+5:30

फलटण : पाडेगाव (ता. फलटण) येथे नियमबाह्यरीत्या कोरोना लसीकरण होत आहे. सत्ताधारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आपल्या मर्जीतील लोकांना ...

Illegal corona vaccination in Padegaon | पाडेगावमध्ये नियमबाह्य कोरोना लसीकरण

पाडेगावमध्ये नियमबाह्य कोरोना लसीकरण

Next

फलटण : पाडेगाव (ता. फलटण) येथे नियमबाह्यरीत्या कोरोना लसीकरण होत आहे. सत्ताधारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आपल्या मर्जीतील लोकांना फ्रंटलाइन वर्कर दाखवून लस देत असल्याची तक्रार भाजप किसान मोर्चाच्या पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

फलटण तालुका भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव दडस या शिष्टमंडळाने फलटण उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांना पाडेगाव येथे नियमबाह्यरीत्या होत असलेल्या लसीकरणाबाबत निवेदन दिले आहे.

या निवेदनामध्ये पाडेगाव (ता. फलटण) येथे पाच ते सहा वेळा लसीकरण झाले आहे. परंतु शासकीय नियमाप्रमाणे या ठिकाणी लसीकरण होताना दिसत नाही. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला लसीपासून वंचित ठेवले जात आहे व सत्ताधारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आपल्याच मर्जीतील लोकांना फ्रंटलाइन वर्कर दाखवून लस देत आहेत, तसेच ज्यांना कोविड होऊन गेला आहे, अशाही लोकांना लस दिली जात आहे. तसेच दोन लसीमधील अंतर दुसऱ्याचा मोबाईल नंबर टाकून कमी केले जाते व परत त्याच व्यक्तींना लस दिली जाते. त्यामुळे सामान्य लोकांना लस उपलब्ध होत नाही. ज्या दिवशी लस मिळणार आहे, त्या दिवशी लोक सकाळपासून नंबर लावून बसतात; परंतु त्यांना लस मिळत नाही तरी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व डॉक्टरांनी यामध्ये राजकारण करू नये. याबाबत आपण लवकर निर्णय घ्यावा व सर्वसामान्य लोकांना लस उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागास सूचना कराव्यात, अन्यथा आम्हाला याबाबत आंदोलन उभे करावे लागेल, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: Illegal corona vaccination in Padegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.