कृष्णा नदीत अवैध वाळू उपसा; पोलिसांत पाच जणांवर गुन्हा नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:36 AM2021-04-03T04:36:02+5:302021-04-03T04:36:02+5:30
सातारा : सातारा शहराजवळील संगम माहुली येथे कृष्णा नदीपात्रातून वाळू उपसा करून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा शहर ...
सातारा : सातारा शहराजवळील संगम माहुली येथे कृष्णा नदीपात्रातून वाळू उपसा करून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारच्या सुमारास वाळू चोरीची ही घटना घडली. याप्रकरणी हवालदार अब्दुल सलीम खलिफा यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार सूरज सर्जेराव कोळपे (रा. क्षेत्र माहुली, ता. सातारा), बाळू अण्णा माने (रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा), शामराव शिवाजी कोळपे (रा. क्षेत्र माहुली), रमेश आत्माराम शिंदे (रा. लक्ष्मी टेकडी, सातारा) आणि अमोल महादेव कांबळे (रा. महागाव, ता. सातारा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी ५ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.