मलकापुरात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:48 AM2021-09-16T04:48:52+5:302021-09-16T04:48:52+5:30
मलकापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मलकापुरात ‘एक नगरपालिका एक गणपती’ या सकारात्मक निर्णयाबरोबरच घरगुती गणेशांचे विसर्जन करण्याचा अनोखा निर्णय पालिकेने ...
मलकापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मलकापुरात ‘एक नगरपालिका एक गणपती’ या सकारात्मक निर्णयाबरोबरच घरगुती गणेशांचे विसर्जन करण्याचा अनोखा निर्णय पालिकेने घेतला. त्यासाठी पालिकेने गणेश विसर्जनाचा मास्टर प्लॅन तयार केला होता. शहरातील नऊ प्रभाग अध्यक्षांसह एक नोडल अधिकारी व पाच ते सहा स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार पालिकेच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्रतिसाद देत ३५० घरगुती गणेशमूर्तींचे पाचव्या दिवशी तीन विहिरींत विसर्जन करण्यात आले.
मलकापूरने आतापर्यंत देशाला व राज्याला अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम दिले. सर्वांना विश्वासात घेऊन दोन दिवसांतच शहरातील ५७ मंडळांनी या उपक्रमास उत्स्फूर्त पाठिंबा देत नुकताच ‘एक नगरपालिका एक गणपती’ हा आदर्श निर्णय सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह मंडळांनी घेतला. या ऐतिहासिक निर्णयाबरोबरच घरगुती गणेश विसर्जनाचीही पालिकेने जबाबदारी घेतली आहे. कोरोनामुळे यावर्षी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घरगुती गणपतींचेही विसर्जन करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.
यासाठी पालिकेने शहरातील ९ प्रभागांसाठी ९ अध्यक्ष व ९ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. त्यांच्या जोडीला पाच ते सहा स्वयंसेवकांसह वाहनांचीही व्यवस्थाही करण्यात आली आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत गौरी-गणपती विसर्जनाच्या पाचव्या दिवशी शहरातील तब्बल एक हजारावर गणेशमूर्तींचे घरातूनच संकलन करून नदीऐवजी विधिवत विहिरीत विसर्जन करण्यात आले. यासाठी सहा छोटा हत्ती व दोन ट्रॅक्टर अशा आठ सजविलेल्या वाहनांची व्यवस्था केली होती. या पर्यावरणपूरक विसर्जनामुळे आणखी एक आदर्श मलकापूर पालिकेने इतरांपुढे ठेवला आहे.
चौकट
अनंत चतुर्दशीला ११ वाहनांचे नियोजन
यावर्षी मलकापूर पालिकेने पर्यावरणपूरक विधिवत गणेश विसर्जनासाठी स्वतंत्र नियोजन केले आहे. शेवटच्या अनंत चतुर्दशीला शहरातील ९ प्रभागात ९ छोटा हत्ती टेम्पो, तर महामार्गाच्या पूर्व व पश्चिमेकडील भागात प्रत्येकी एक ट्रॅक्टर अशा ११ वाहनांचे नियोजन पालिकेने केले आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष शिंदे यांनी दिली आहे.
(चौकट)
विसर्जनासाठी विहिरी अन् खणींचा वापर
मलकापुरातील सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे जाधव पाणवठा, पाचवडेश्वर व प्रीतिसंगमावर विसर्जन करण्याची परंपरा आहे. यावर्षी मलकापूर पालिकेने पर्यावरणपूरक विधिवत गणेश विसर्जनासाठी स्वतंत्र नियोजन केले आहे. नदीप्रदूषण व गर्दी टाळण्यासाठी पालिकेनेच विसर्जनाची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार विसर्जनासाठी तीन विहिरी आणि खणींचा वापर केला आहे.
फोटो कॅप्शन
मलकापूर पालिकेने गल्लोगल्ली जाऊन नागरिकांना आवाहन करत फुलांनी सजविलेल्या वाहनांतून घरगुती गणेशमूर्तींचे संकलन करून त्यांचे विहिरीत विसर्जन केले. (छाया : माणिक डोंगरे)
150921\1559-img-20210915-wa0020.jpg
फोटो कॕप्शन
मलकापूर पालिकेने गल्लो-गल्ली जाऊन नागरिकांना आवाहन करत फुलांनी सजवलेल्या वाहनांतून घरगुती गणेशमूर्तींचे संकलन करून त्यांचे विहिरीत विसर्जन केले. (छाया-माणिक डोंगरे)