अवकाळी पावसाचा पिकांवर परिणाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:42 AM2021-01-13T05:42:53+5:302021-01-13T05:42:53+5:30

आदर्की : फलटण पश्चिम भागात ३ ते ७ जानेवारीदरम्यान कमी-जास्त प्रमाणात पावसाच्या सरी व दाट धुके पडल्याचा परिणाम झाल्याचे ...

Impact of untimely rains on crops ... | अवकाळी पावसाचा पिकांवर परिणाम...

अवकाळी पावसाचा पिकांवर परिणाम...

Next

आदर्की : फलटण पश्चिम भागात ३ ते ७ जानेवारीदरम्यान कमी-जास्त प्रमाणात पावसाच्या सरी व दाट धुके पडल्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पावसाने ज्वारीची कणसे काळी पडली असून, गहू, हरभरा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. आंब्याचे मोहर जळाल्याने रब्बी हंगाम वाया जाणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

फलटण पश्चिम तालुक्यातील आदर्की महुसली मंडलात अधूनमधून पावसाच्या सरी, रिमझिम पाऊस, दाट धुके, वारा, थंडी पडल्याने ज्वारीची कणसे काळी पडून फुलोऱ्यातच जळाला आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादनात घट होणार आहे तर ज्वारी काळी पडून भाकरीची चव बदलणार आहे. गहू पिकावरही तांबेरा व मावा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. हरभरा पीक घाटे

भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे घाट्यावर अळी पडणार आहे. आंब्याला मोहर येत असताना पाऊस व धुके पडल्याने मोहर जळाला आहे. कांदा पिकावर करपा रोग पडल्याचे दिसत आहे. विचित्र हवामानामुळे पिकावर परिणाम झाल्यामुळे सलग तीन वर्षे रब्बी हंगाम वाया जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

१२ आदर्की

फोटो : अवकाळी पावसाने हिंगणगाव, सासवड, बिबी, आदर्की परिसरात ज्वारीची कणसे काळी पडली आहेत.

Web Title: Impact of untimely rains on crops ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.