पोषण अभियान कार्यक्रम प्रभावीपणे राबवा : मंगेश धुमाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:23 AM2021-03-30T04:23:21+5:302021-03-30T04:23:21+5:30
पिंपोडे बुद्रुक : ‘एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणारा पोषण अभियान कार्यक्रम गावोगावी प्रभावीपणे राबवा,’ असे आवाहन जिल्हा ...
पिंपोडे बुद्रुक : ‘एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणारा पोषण अभियान कार्यक्रम गावोगावी प्रभावीपणे राबवा,’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी समिती सभापती मंगेश धुमाळ यांनी केले.
रणदुल्लाबाद (ता.कोरेगाव) येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कोरेगाव २, पिंपोडे बीट २ अंतर्गत पोषण अभियान कार्यक्रमाप्रसंगी कृषी सभापती धुमाळ बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गुलाबराव जगताप, सरपंच मंगेश जगताप, उपसरपंच सपना ढमाळ, ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन जगताप, राणी पंडित, माजी उपसरपंच सुरेश देशमुख, सोसायटीचे अध्यक्ष विश्वासराव जगताप, डॉ.महेश जगताप, मोहन जगताप, राहुल जगताप, प्रशांत जगताप, कांतीलाल जगताप, हरिश्चंद्र सोनावणे आदी उपस्थित होते.
बाल विकास प्रकल्प कोरेगाव २च्या ज्योत्स्ना कापडे, इंगवले, वांगीकर, विद्या बगाडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून पोषण अभियान कार्यक्रमाची उपस्थितांना माहिती दिली. आहार प्रदर्शन, अर्धवार्षिक वाढदिवस, सेल्फी पॉइंट, रांगोळी प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा आदी कार्यक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.
कोरोनामुळे नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ग्रामसेवक राजेंद्र अहिरेकर यांच्यासह परिसरातील सर्व गावातील अंगणवाडीसेविका, मदतनीस उपस्थित होत्या.
......................................
फोटो ओळ : रणदुल्लाबाद, ता.कोरेगाव येथे पोषण अभियान कार्यक्रमात मंगेश धुमाळ, गुलाबराव जगताप, मंगेश जगताप, सपना ढमाळ आदी उपस्थित होते. (छाया : संतोष धुमाळ)
\\\\\\\\\\\\\\\\\