आनेवाडीच्या टोलनाक्यावर फास्टॅगची अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:11 AM2019-12-16T00:11:58+5:302019-12-16T00:12:49+5:30
पाचवड : आशियाई महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर फास्टॅगची अंमलबजावणी सुरू झाली असून, वाहनचालकांकडून प्रतिसाद मिळत आहे. यामुळे टोल देण्यासाठी लागणाऱ्या ...
पाचवड : आशियाई महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर फास्टॅगची अंमलबजावणी सुरू झाली असून, वाहनचालकांकडून प्रतिसाद मिळत आहे. यामुळे टोल देण्यासाठी लागणाऱ्या वेळेमध्ये बचत होणार असून, वाहनकोंडीलाही आळा बसण्यास मदत होईल. तर प्रत्येक शनिवार व रविवारी रांगा लागत होत्या. आता मात्र फास्टॅगने कोंडी संपुष्टात आल्याने चालक व प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
टोलनाक्यांवर टोल स्वीकारताना लागणाºया लांबच लांब रांगांमुळे वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास होत होता. यावर तोडगा काढताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने फास्टॅग ही इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रणाली सुरू केलेली आहे. अनेक टोलनाक्यांवर ही प्रणाली वापरण्यास सुरुवात झाली असून, त्याच अनुषंगाने आनेवाडी टोलप्रशासनाने देखील ही सुविधा देण्यास सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक मुख्य शहरांना जोडणाºया आशियाई महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर शनिवार, रविवार त्याचबरोबर सलग सुट्यांच्या कालावधीमध्ये वाहनांच्या रांगा लागत होत्या. मात्र, फास्टॅग प्रणालीमुळे आता अशा रांगा टोलनाक्यावर पुन्हा पाहायला मिळणार नाहीत. फास्टॅग प्रणालीच्या अंमलबजावणीपासून हा बदल आता दिसू लागल्याची माहिती टोलव्यवस्थापनाकडून देण्यात आली.
फास्टॅग कोठे मिळेल?
वाहनचालक, प्रवासी व नागरिकांना राष्ट्रीयीकृत बँका, सर्व टोलनाके तसेच आॅनलाईन व्यवसाय करणाºया कंपन्यांकडून फास्टॅग मिळू शकतो. आपल्या वाहनाच्या पुढील बाजूच्या काचेवर तो व्यवस्थित ट्रॅक होईल, अशारितीने तो चिकटवायचा आहे. फास्टॅग काढण्यासाठी वाहनाचे आरसी बुक व कोणतेही आयडेंटी असणारे कागदगपत्र आवश्यक आहे.
वेगळी लेन...
दुचाकी वाहने वगळून इतर सर्व वाहनांना फास्टॅग वापरणे आता बध्ांनकारक आहे. फास्टॅग वापरणाºया वाहनांना टोलनाक्यांवर वेगळी लेन करण्यात येणार आहे. सध्यातरी आनेवाडी टोलनाक्यावर फास्टॅग वाहनांसाठी वेगळी लेन नसलीतरी लवकरच ती तयार करण्यात येणार असल्याची माहिती टोल प्रशासनाकडून देण्यात आली.
स्थानिकांकडून वसुली नाही
फास्टॅगबाबत अनेक स्थानिक वाहनचालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, फास्टॅग प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे कोणत्याही स्थानिक वाहनचालकाकंडून टोलवसूल करण्यात येणार नाही. त्यामुळे स्थानिकांनी याबाबत संभ्रमित होऊ नये, असे आवाहनही आनेवाडी टोल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.