ज्योतीच्या घरात सापडली महत्त्वाची कागदपत्रे !
By admin | Published: August 26, 2016 12:30 AM2016-08-26T00:30:20+5:302016-08-26T01:13:47+5:30
कुत्र्यांना मारणाऱ्या पोळवर गुन्हा दाखल करा--संतोष पोळला एक दिवसाची पोलिस कोठडी, तर ज्योतीला न्यायालयीन कोठडी;
पोलिस दोन तास तळ ठोकून : संतोष पोळला एक दिवसाची पोलिस कोठडी, तर ज्योतीला न्यायालयीन कोठडी; दोघांना पुन्हा आज न्यायालयात हजर करणार
वाई : सिरियल किलर संतोष पोळला तीन गुन्ह्यांत साथीदार असलेल्या ज्योती मांढरेच्या सह्याद्रीनगरमधील घरात पोलिसांनी गुरुवारी झडती घेतली. यावेळी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. ज्योतीच्या घरात सापडलेली कागदपत्रे नेमकी कोणत्या स्वरूपाची आहेत. याची माहिती मात्र पोलिसांनी गोपनिय ठेवली आहे.
दरम्यान, डॉ़ संतोष पोळ याच्याकडून आत्तापर्यंत पोलिसांनी सहा मोबाईल जप्त केले असून, त्याने कोणा-कोणाशी संपर्क साधला, हे तपासण्यासाठीही पोलिसांनी पोलिस कोठडी वाढवून घेतली आहे. पोळचे काही पोलिसांशीही चांगली ओळख होती. त्याचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर याची माहिती समोर येणार आहे.
भविष्यात आणखी कोणाचा संतोष पोळ बळी घेणार होता का, या अनुषंगानेही ज्योतीकडे पोलिस कसून
चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)
वाईतही वकीलपत्र घेण्यास नकार
सातारा जिल्हा बार असोसिएशनने संतोष पोळचे वकील पत्र घेण्यास नकार दिल्यानंतर वाई येथील वकिलांनीही हीच भूमिका घेतली आहे.
वाई तालुक्याच्या इतिहासात क्रौर्याची सीमा पार करणाऱ्या सिरियल किलर संतोष व त्याची साथीदार ज्योती मांढरे यांचे वकीलपत्र न घेण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अॅड़ दिनेश धुमाळ व उपाध्यक्ष संतोष जाधव यांनी दिली़
कुत्र्यांना मारणाऱ्या पोळवर गुन्हा दाखल करा
सातारा : कोल्ड ब्लडेड सिरियल किलर संतोष पोळने सहा खुनांची कबुली दिल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. संतोषने सुरेखा चिकणे यांच्या खुनानंतर पंधरा ते वीस कुत्र्यांना विष देऊन मारल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्राणिमित्रांमधून संताप व्यक्त होत असून, संतोषवर नवा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्राणिमित्रांमधून केली जात आहे.
संतोष पोळने २००३ पासून खुनाचे सत्र सुरू केले होते. त्याने आत्तापर्यंत सात खून केल्याची कबुली दिली आहे. २००३ पासून तेरा वर्षांमध्ये सात खून अगदी पद्धतशीरपणे केले आहेत. आपली प्रकरणी उघडकीस येऊ नयेत, म्हणून तो दरवेळी नवनवीन गुन्हे करत गेल्याचे आजवरच्या तपासावरून दिसत आहे.
खून केल्यानंतर तो राहत असलेले घर किंवा फार्म हाऊसमध्ये पुरत होता. ही घटना कोणाच्या निदर्शनास येऊ म्हणून त्यावर तो झाडे लावत होता; पण मंगल जेधे खूनप्रकरणात तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला अन् एक-एक गुन्हे समोर येत गेले.
संतोषने सुरेखा चिकणे यांचा खून केल्यानंतर परिसरातील कुत्रे त्या ठिकाणी भटकत असायचे. चिकणे यांना पुरलेली जागा या कुत्र्यांनी उकरली तर त्यामुळे आपण केलेले कृत्य उजेडात येण्याची भीती त्याला सतावत होती.
त्यातूनच त्याने परिसरातील कुत्र्यांना विष देऊन मारून टाकल्याचे सांगितले जात आहे. मारलेल्या कुत्र्यांचा आकडाही लहान नसून तब्बल पंधरा ते वीस कुत्र्यांची संख्या आहे.
सात खुनानंतर आता कुत्र्यांना मारल्याप्रकरणीही नवीन गुन्हा दाखल करण्याची मागणी प्राणिमित्रांमधून केली जात आहे.
संतोषने खून लपविण्यासाठी लावलेली झाडेही तोडावी लागली आहेत. त्यामुळे साहजिकच प्राणिमित्र आणि पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. निष्पाप कुत्र्यांना विष घालून मारणाऱ्या संतोष पोळवर गुन्हा दाखल
मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)