जनता बँकेत भागधारकच पुन्हा कारभारी...सर्व २१ जागांवर कब्जा

By नितीन काळेल | Published: June 18, 2023 07:12 PM2023-06-18T19:12:35+5:302023-06-18T19:12:43+5:30

चाैघे बिनविरोध; १७ जागाही मताधिक्याने जिंकल्या .

In Janata Bank, the shareholders are again in charge... | जनता बँकेत भागधारकच पुन्हा कारभारी...सर्व २१ जागांवर कब्जा

जनता बँकेत भागधारकच पुन्हा कारभारी...सर्व २१ जागांवर कब्जा

googlenewsNext

सातारा : सातारा शहरवासियांची अऱ्थवाहिनी असणाऱ्या जनता सहकारी बॅंक निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भागाधारक पॅनेलने मतदानातीलही १७ जागाही बहुमताने जिंकल्या. तर पूर्वीच चाैघेजण बिनविरोध निवडूण आले आहेत. त्यामुळे सर्व २१ जागांवर कब्जा केल्याने भागधारककडे पुन्हा एकदा बॅंकेचा कारभार गेला आहे.

सातारा शहरातील जनता बॅंकेच्या २१ संचालकपदासाठी निवडणूक जाहीर झाली होती. यासाठी सर्वसाधारणमधून १६ जणांना निवडून द्यायचे होते. महिला प्रवर्ग २, अनुसूचित जाती-जमाती गटातून १, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास गट १ आणि ओबीसी गटातूनही एका संचालकाला निवडून द्यायचे होते. यामधील विशेष मागास गटात एकच अर्ज आला होता. त्यामुळे बाळासाहेब गोसावी यांची बिनविराेध निवड झाली होती. तर माघार घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत महिलांमधीलही दोन जागा बिनविरोध झाल्या.

यामध्ये सुजाता राजेमहाडिक आणि चेतना माजगावकर यांचा समावेश आहे. तर अनुसूचित जाती-जमाती गटातूनही प्रकाश बडेकर यांनी माघार घेतल्याने विजय बडेकर यांची बिनविराेध निवड झालेली. अशाप्रकारे सत्ताधारी भागधारक पॅनेलचे मतदानापूर्वीच चाैघेजण बिनविरोध निवडूण गेले होते. त्यामुळे १७ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये सर्वसाधारणमधील १६ आणि ओबीसीमधील एका जागेसाठी मतदान झाले होते. सर्वसाधारणमध्ये १७ आणि ओबीसी प्रवर्गात दोनच उमेदवार रिंगणात होते.

बॅंकेसाठी शनिवारी जिल्ह्यातील विविध ३४ केंद्रावर मतदान झाले होते. एकूण २१ हजार ८१ मतदार होते. पण, ३२ टक्के मतदारांनीच हक्क बजावला. तर रविवारी सकाळपासून शहरातील नागरी बॅंक असोसिएनच्या इमारतीत मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये सुरुवातीपासूनच सत्ताधारी भागधारक पॅनेलचे उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा विजय निश्चीत होता. दुपारनंतर निकाल लागला. सर्व १७ जागा सत्ताधाऱ्यांनी जिंकत बॅंकेचा कारभार पुन्हा हाती घेतला आहे. तर या विजयानंतर सत्ताधाऱ्यांनी गुलाल उधळत शहरातून मिरवणूक काढली.

दरम्यान, या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनुराधा पंडितराव यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

भागधारकचे विजयी उमेदवार अन् मिळालेली मते...

सर्वसाधारण गट
आनंदराव कणसे ५,१०९

विनोद कुलकर्णी ४,३८६
अक्षय गवळी             ५,११५

चंद्रशेखर घोडके ५,०५९
जयेंद्र चव्हाण ४,९८९

मच्छिंद्र जगदाळे ४,७३९
वजीर नदाफ             ४,५५७

अविनाश बाचल             ४,६७५
चंद्रकांत बेबले             ४,७६४

जयवंत भोसले            ५,१३५
रवींद्र माने ४,८०३

अमोल मोहिते ५,१०६
वसंत लेवे ४,९३९

नारायण लोहार             ४,६११
रामचंद्र साठे             ४,६५२

माधव सारडा ४,८५४

इतर मागास प्रवर्ग

अशोक माने ५,०२२

बिनविरोध निवडूण आलेले भागधारकचे उमेदवार

- बाळासाहेब गोसावी, विजय बडेकर, सुजाता राजेमहाडिक आणि चेतना माजगावकर

पराभूत उमेदवार...

सर्वसधारणमधून अपक्ष शकील बागवान यांचा पराभव झाला. त्यांना २ हजार ३५३ मते मिळाली. तर ओबीसी प्रवर्गातही भागधारकचे अशोक मोने आणि अपक्ष चारुदत्त सपकाळ यांच्यात दुरंगी लढत झाली. यामध्ये सपकाळ यांचा पराभव झाला. त्यांना १ हजार ३३५ मते मिळाली.

मतदान असे झाले...

- सर्वसाधारणमध्ये ६,८१३ मतदान. वैध मते ६,३५६. बाद मते ४५७.

- ओबीसी प्रवर्गमध्ये ६,७९२ मतदान. वैध मते ६,३५७. बाद मते ४३५

Web Title: In Janata Bank, the shareholders are again in charge...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.