जिल्ह्यातील वैशिष्टपूर्ण मतदान केंद्रे; मतदारांना करतात आकर्षित...
By नितीन काळेल | Updated: May 6, 2024 19:57 IST2024-05-06T19:57:06+5:302024-05-06T19:57:21+5:30
सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होत आहे.

जिल्ह्यातील वैशिष्टपूर्ण मतदान केंद्रे; मतदारांना करतात आकर्षित...
सातारा : सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात वैशिष्टपूर्ण मतदान केंद्राची संकल्पना राबविली आहे. यामध्ये युवा मतदान केंद्र, जय जवान, सखी, जय किसान, सक्षम, ‘ती’चे मतदान केंद्र अशी काही मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्याचबरोबर आकर्षक पध्दतीने ही मतदान केंद्रे सजविण्यात आल्याने मतदारांचे लक्ष वेधले जात आहे.
सातारा जिल्ह्यातील वैशिष्टपूर्ण मतदान केंद्रे; मतदारांना करतात आकर्षित #LokSabhaElections2024#satarapic.twitter.com/HYSZJN41y1
— Lokmat (@lokmat) May 6, 2024