कऱ्हाडातील जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सातारचा डंका!
By प्रमोद सुकरे | Published: October 15, 2022 04:33 PM2022-10-15T16:33:55+5:302022-10-15T17:10:31+5:30
सद्गगुरु गाडगे महाराज महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने नाम फाउंडेशनला मदतीचा हात!
कऱ्हाड : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित केलेला ४२वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव कऱ्हाडात शुक्रवारी उत्साहात संपन्न झाला. यात जिल्ह्यातील ४६ महाविद्यालयातून १ हजारावर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. याचा निकाल रात्री उशिरा जाहीर झाला. सातारच्या ४ महाविद्यालयांनी ६ सांघिक स्पर्धात प्रथम क्रमांक पटकावत डंका वाजवला आहे. तर तीन स्पर्धांमध्ये कऱ्हाडच्या दोन महाविद्यालयांनी बाजी मारली आहे.
येथील सद्गगुरु गाडगे महाराज महाविद्यालयात हा महोत्सव घेण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल, प्राचार्य मोहन राजमाने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
स्पर्धेतील निकाल कला प्रकारानुसार अनुक्रमे पुढीलप्रमाणे
लोककला- सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, दहिवडी कॉलेज दहिवडी
लोकनृत्य - यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा, मुधोजी कॉलेज फलटण, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा.
मुकनाट्य - दहिवडी कॉलेज दहिवडी, सावित्रीबाई फुले महाविद्यालय सातारा, मुधोजी कॉलेज फलटण.
नकला- यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, मुधोजी कॉलेज फलटण.
वादविवाद - डी पी भोसले कॉलेज कोरेगाव, गव्हरर्मेंट कॉलेज इंजिनिअरिंग कराड, इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज सातारा .
सुगमगायन- गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराड, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, मुधोजी कॉलेज फलटण.
लोकसंगीत वाद्यवृंद- मुधोजी कॉलेज फलटण, यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा ,डी पी भोसले कॉलेज कोरेगाव.
लघुनाटिका - धनंजय गाडगीळ कॉलेज सातारा, मुधोजी कॉलेज फलटण, आमदार शशिकांत शिंदे कॉलेज मेढा
एकांकिका - शंकरराव जगताप कॉलेज वाघोली सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे.
समूहगीत- मुधोजी कॉलेज फलटण, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड.
पथनाट्य- यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज कराड, किसनवीर महाविद्यालय वाई, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड.
प्रश्नमंजुषा- यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा, डी पी भोसले कॉलेज कोरेगाव
मराठी वक्तृत्व - आर्टस अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा
हिंदी वक्तृत्व - डी पी भोसले कॉलेज कोरेगाव, सावित्रीबाई फुले महाविद्यालय सातारा, मुधोजी कॉलेज फलटण
इंग्रजी वक्तृत्व- गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराड, सद्गगुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा
सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये विजय झालेल्या संघांनी १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान आटपाडी येथील बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात होणाऱ्या मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी उपस्थित राहावे असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
नाम फाउंडेशनला मदतीचा हात!
युवा महोत्सवाच्या निमित्ताने उद्घाटनाला आलेले पाहुणे नाना पाटेकर यांचे नाम फाउंडेशन च्या माध्यमातून सुरू असणारे काम सर्वश्रुत आहे. त्या कामाला मदत म्हणून सद्गगुरु गाडगे महाराज महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश प्राचार्य डॉ. मोहन राजमाने व अँड. रवींद्र पवार यांच्या हस्ते पाटेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.