धनगर समाजाचे फलटणमध्ये बेमुदत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:53 PM2018-07-29T22:53:41+5:302018-07-29T22:53:53+5:30
<p>फलटण : धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करावा, यासाठी निर्णायक लढा उभा करण्यासाठी फलटण तालुक्यातील तमाम धनगर समाजबांधवांच्या वतीने फलटण तहसील कार्यालयासमोर रविवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाजाने सरकारविरोधात फलटणमधून रणसिंग फुंकल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
धनगर समाज बऱ्याच दिवसांपासून एसटी आरक्षणाची मागणी करीत आहे. मात्र सरकारकडून ठोस कारवाई होत नसल्याने आणि बरीच वर्षे चालढकल झाल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत. धनगर बांधवांनी मराठा समाजाप्रमाणे निर्णायक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. येथील समाजाच्या विविध मान्यवरांनी एकत्र येत समाजासाठी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत येथील तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याबरोबर समाजातही जागृती घडवून समाज पेटून उठेल. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटतील, अशा पद्धतीने नियोजन करून रविवारी आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी आंदोलनस्थळी ठेवण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन महिला भगिनींच्या हस्ते करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात समाजबांधव आणि महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.
अनेकांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. बारामतीला झालेल्या आंदोलनाच्या आठवणी अनेकांनी जागा केल्या. २०१४ रोजी बारामती येथे धनगर समाजाने मोठ्या प्रमाणावर आरक्षणाचा लढा उभा केला. समाजातील काही युवक नऊ दिवस उपोषणास बसले होते. त्या उपोषणाची सांगता करण्यासाठी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आमचे सरकार आल्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ,’ असे आश्वासन दिले होते. चार वर्षांत कॅबिनेटच्या शेकडो बैठका झाल्या तरी आरक्षणाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. त्यांनी धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याशिवाय काही केले नाही. जर तत्काळ आरक्षण दिले नाही तर या नाकर्ते सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय धनगर समाज राहणार नाही.
सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी यांच्या नावाची मागणी
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात यावे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी, मेंढी विकास महामंडळास आर्थिक तरतूद करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे, असे संयोजकांनी स्पष्ट केले.