वाठार स्टेशनमध्ये कोरोना सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:40 AM2021-05-09T04:40:32+5:302021-05-09T04:40:32+5:30
वाठार स्टेशन : वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील शिवसाई मंगल कार्यालयात शनिवारी जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याहस्ते कोरोना ...
वाठार स्टेशन : वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील शिवसाई मंगल कार्यालयात शनिवारी जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याहस्ते कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉ. अभय तावरे, मंगेश धुमाळ, उपसभापती संजय साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र जाधव, वाठारस्टेशनचे सरपंच नीता माने, उपसरपंच अनिल माने उपस्थित होते.
वाठार स्टेशन परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. काही गावे हॉटस्पॉट बनली आहेत. जिल्हाधकाऱ्यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली असून. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाठार स्टेशन येथे ३० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरणाची सोय करण्यात येणार आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अंकुश जाधव, माजी उपसरपंच नागेश जाधव, माजी सरपंच अमोल आवळे, भीमाशंकर अहिरेकर, संजय भोईटे, उमेश डोईफोडे, तलाठी नामदेव नाळे, एम. एस. शिंदे, एच. एस. गवळी, ए. एच. घुगे, ए. एन. जाधव उपस्थित होते.