देऊर येथे कोरोना विलगीकरण कक्षाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:41 AM2021-05-18T04:41:34+5:302021-05-18T04:41:34+5:30
यावेळी आमदार शिंदे म्हणाले, ‘महाविद्यालय आणि देऊर ग्रामपंचायतीने संयुक्तपणे सुरू केलेला हा विलगीकरण कक्ष काळाची नितांत गरज आहे. ...
यावेळी आमदार शिंदे म्हणाले, ‘महाविद्यालय आणि देऊर ग्रामपंचायतीने संयुक्तपणे सुरू केलेला हा विलगीकरण कक्ष काळाची नितांत गरज आहे. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण बाहेरगावातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात जाण्यास धजावत नाहीत. गृह विलगीकरणात घरी पुरेशा सुविधा नसल्याने अन्य सदस्यांनाही बाधा होण्याचा धोका वाढतो. याकरिता आज गावोगावी असे कक्ष निर्माण करणे गरजेचे झाले आहे. या सामाजिक उपक्रमात प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे.’
‘महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोरोना विरुद्धच्या लढ्यातील हे योगदान महत्त्वाचे आहे,’ असे प्रतिपादन पळशी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली जाधव यांनी केले.
हा विलगीकरण कक्ष इंग्लिश मीडियम स्कूल, देऊर या ठिकाणी सुरू केले आहे. याप्रसंगी श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे चेअरमन, प्राचार्य डॉ. भारत भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम, सरपंच शामराव कदम , देऊर जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर पूजा गोरे, मनीषा जाधव उपस्थित होते.