आजी-माजी पॅरामिलिटरी कल्याण संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:05 AM2021-02-05T09:05:14+5:302021-02-05T09:05:14+5:30
शेंद्रे : जिल्ह्यातील पॅरामिलिटरी कल्याण संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन वनवासवाडी येथे आमदार महेश शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. सातारा ...
शेंद्रे :
जिल्ह्यातील पॅरामिलिटरी कल्याण संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन वनवासवाडी येथे आमदार महेश शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील पॅरामिलिटरीमधील जवानांच्या विविध मागण्यांचा शासनदरबारी पाठपुरावा करून पॅरामिलिटरी कल्याण संघाला सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन आमदार शिंदे यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील अनेक जवान आर्मी, एअरफोर्स, नेव्ही याप्रमाणेच सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, आसाम रायफल या निमलष्करी दलात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत; परंतु त्यांना भारतीय लष्करासारख्या सेवा-सुविधा उपलब्ध होत नाहीत. या निमलष्करी दलात काम करणाऱ्या जवानांच्या शासनदरबारी विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी तसेच त्यांना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती जवान व त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच समाजोपयोगी कार्याच्या उद्देशाने सातारा जिल्ह्यात आजी-माजी पॅरामिलिटरी कल्याण संघाची स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे, संजय घोरपडे, चिन्मय कुलकर्णी, संघटनेचे अध्यक्ष माणिकराव कदम, उपाध्यक्ष रामचंद्र पवार, सचिव सचिन शिंदे, खजिनदार रामचंद्र जाधव, सूर्यकांत कडव, सतीश माने, बजरंग नाळे, सदस्य प्रदीप घोरपडे, सुरेश निकम, शांताराम मोरे, धनाजी बाबर, शिवाजी नावडकर, दिलीप जाधव, विलास साखरे तसेच पॅरामिलिटरीचे जवान दीपक बागल, अक्षय शेडगे, सोपान सावंत, दिलीप कणसे उपस्थित होते.