जळव येथे ग्रामसचिवालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:20+5:302021-07-05T04:24:20+5:30

पाटण : दिवंगत बाळासाहेब ठाकरे मातोश्री योजनेमधून जळव, ता. पाटण येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन माजी पंचायत समिती ...

Inauguration of Village Secretariat at Jalav | जळव येथे ग्रामसचिवालयाचे उद्घाटन

जळव येथे ग्रामसचिवालयाचे उद्घाटन

Next

पाटण : दिवंगत बाळासाहेब ठाकरे मातोश्री योजनेमधून जळव, ता. पाटण येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे यांच्या हस्ते झाले. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होत आहे. अभिजित पाटील, नामदेवराव साळुंखे, किशोर बारटक्के, श्रीकांत सोनवले, माणिक पवार, सुहास सपकाळ, सचिन कदम, अमोल घाडगे, सरपंच शीतल कदम, उपसरपंच राजू कदम आदी उपस्थित होते. नामदेवराव साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. राजू कदम यांनी आभार मानले.

इनरव्हील क्लबच्या पुरस्कारांचे वितरण

कºहाड : इनरव्हील क्लब आॅफ कऱ्हाड आणि कऱ्हाड संगमच्या वतीने जिजाऊ पुरस्काराने प्रा. सुषमा पाटील तर आदर्श माता पुरस्काराने सुवर्णा मोहिते यांना सन्मानित करण्यात आले. इनरव्हील क्लब अंबरनाथ हिल्सच्या माजी अध्यक्षा स्वाती जगताप, क्लबच्या अध्यक्षा छाया पवार, विद्या पावस्कर, माहेश्वरी जाधव, श्रृती जोशी, सोनाली पाटील, चांदणी नदाणी, वृषाली पाटणकर, रंजना माने, अश्विनी कोळी, अश्विनी थोरात, सोनाली थोरात, रतन शिंदे, शिवांजली पाटील आदी उपस्थित होत्या. क्लबच्या वतीने दरवर्षी राजमाता जिजाऊ पुरस्कार व आदर्श माता पुरस्कार देऊन समाजातील महिलांना सन्मानित केले जाते.

विंगमध्ये बिबट्याची दहशत कायम

कऱ्हाड : विंग, ता. कऱ्हाड परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा बनला आहे. गावठाणाभोवती वस्तीवर त्याचा मुक्काम असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात जाण्यास शेतकरी घाबरू लागले आहेत. गत महिन्यापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. त्याच्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले केले जात आहेत. गत आठवड्यात कानिफनाथ मंदिर परिसरात त्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर मोरेवस्ती परिसरात दोन बछड्यांसह मादीला अनेकांनी पाहिले. वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे सुतारकी वस्ती, कणसे मळा, मसोबा माळ, फडके वस्ती आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मुंढे येथे जयंत पाटील यांचा सत्कार

कऱ्हाड : पालिकेतील लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाली. त्याबद्दल मुंढे, ता. कऱ्हाड ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा उपसरपंच सागर पाटील, माजी सरपंच रमेश लवटे, माजी सरपंच आनंदराव जमाले, माजी उपसरपंच भीमराव जमाले, संभाजीराव साळवे, ग्रामपंचायत सदस्य अशोक माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महंमद आवटे, राष्ट्रवादी प्रवक्ता सेलचे जिल्हा प्रतिनिधी शरद भोसले, सुभाष जमाले, प्रताप जाधव यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

Web Title: Inauguration of Village Secretariat at Jalav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.