अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्यानं उघडलं गूढ; महाबळेश्वरात खळबळ, वेगळच प्रकरण समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 11:51 AM2021-09-24T11:51:55+5:302021-09-24T11:57:30+5:30
पोलिसांनी पोक्सो अंतर्गत सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे या दोघांवर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
सातारा: राज्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरात एका घटनेनं खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलीने काही दिवसांपूर्वी लहान बाळाला घरातच जन्म दिल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. तपासाअंती या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत दोन मुख्य आरोपींसह नऊ जणांवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी महाबळेश्वरमध्ये मोलमजुरी करुन आपला चरितार्थ चालवते. मुख्य आरोपी सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे यांनी या मुलीवर लैंगिक अत्याचार करत केले, ज्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. काही दिवसांपूर्वी या मुलीची घरातच प्रसुती करण्यात आली ज्यावेळी तिने एका लहान मुलीला जन्म दिला. याबाबत वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे यांना याबाबत माहिती मिळताच तत्काळ त्यांनी घटनास्थळी भेट देली. संबंधित अल्पवयीन मुलगी व कुटुंबियांना विश्वासात घेत माहिती घेतली.
डॉक्टर तरुणीवर बलात्कार; त्यानंतर तिच्याच आई- वडिलांना पाठवला व्हिडिओ, औरंगाबादमधील प्रकार https://t.co/2IYZWh9AUA
— Lokmat (@MiLOKMAT) September 24, 2021
सर्व प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा पोलिसांनी पोक्सो अंतर्गत सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे या दोघांवर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांचा मुलगा योगेश बावळेकर आणि सात्विक बावळेकर यांच्या मदतीने हे बाळ कांदीवली येथील चौरसिया या कुटुंबाला हे बाळ दिले होते. याबाबत पोलिसांनी या सर्व प्रकरणात 13 जणांवर गुन्हे दाखल केल्यानंतर यात चौघांना अटक झाली असून शिवेसेना नेते डी एम बावळेकर यांच्या दोन मुलांसह 9 नऊ जण फरार झाले असून सर्वांचा पोलिस शोध घेत आहेत.
प्रकरण नेमकं कसं बाहेर आलं?-
पीडितेनं बाळाला जन्म दिल्यानंतर हे प्रकरण बाहेर पडले. बाळ मुंबई येथील चौरसिया कुटुंबाला बाँड करुन दिले. आनंद हिरालाल चौरसिया, सुनिल हिरालाल चौरसिया आणि पुनम हिरालाल चौरासिया या कुटुंबाला दिले. सनी उर्फ सत्चित दत्तात्रय बावळेकर यांनी बाँन्ड खरेदी केला. बॉन्ड महाबळेश्वरातील सनी हॉटलमध्ये केला.
चौरसिया कुटुंबाने हे बाळ घेऊन जाण्यापूर्वी त्याची पूजाअर्चना ही महाबळेश्वरातीलच सनी हॉटेलमध्येच केली. यासर्व प्रक्रियेतील बाँन्ड करणारा वकिल आणि विधी करणारा जंगम या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. चौरसिया कुटुंबाला हे बाळ दत्तक देताना पैसे घेतल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. सध्या बाळ हे मुंबई येथील एका रुग्णालयात उपचार घेत असून त्याच्या शेजारी आता पोलिस ठेवण्यात आले आहेत. बाँन्ड झाला त्यावर या सर्व आरोपींच्या सह्या आहेत.
धक्कादायक! डोंबिवलीनंतर आता कल्याण हादरलं; ८ वर्षांच्या मुलीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार https://t.co/nmMBjpf3U7
— Lokmat (@MiLOKMAT) September 24, 2021