प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत जिहेकठापूरचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:26+5:302021-07-01T04:26:26+5:30

औंध : ‘खटाव, माण या कायम दुष्काळी तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेची उर्वरित कामे ...

Include Jihekathapur in Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत जिहेकठापूरचा समावेश करा

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत जिहेकठापूरचा समावेश करा

googlenewsNext

औंध : ‘खटाव, माण या कायम दुष्काळी तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी या योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करावा किंवा नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकासनिधीअंतर्गत नवीन मालिका २७ मध्ये समावेश करून लागणारा सर्व निधी मिळावा,’ अशी मागणी आमदार जयकुमार गोरे यांनी केली.

जलशक्ती मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना दिलेल्या निवेदनात गोरे यांनी म्हटले आहे की, जिहेकठापूर उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी बारा वर्षांपासून प्रयत्न करत आहे. योजनेच्या वाढीव खर्चाला दोन वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे काम राज्यातील भाजपा सरकारने केले होते. या योजनेसाठी ६१७ कोटींचा निधी खर्च केला आहे. महिनाभरात अंशत: योजना कार्यान्वित करून नेर धरण आणि येरळा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. योजनेची उर्वरित कामे करण्यासाठी आणखी ६४२ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी मिळण्यासाठी जिहेकठापूर उपसा सिंचनचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करावा, त्यासाठी जलशक्ती मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

केंद्र शासनाकडून जिहेकठापूरसाठी लागणारा उर्वरित निधी प्राप्त झाल्यावर नेर उपसा सिंचन १ आणि २ तसेच आंधळी बोगद्यातून पाणी माणमधील आंधळी धरण आणि माण नदीत सोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आंधळी धरणातून पाणी उचलून उत्तर माणमधील गावांची तहान भागविणारी आंधळी उपसा सिंचन योजना तसेच योजनेच्या दुसऱ्या उर्ध्वगामी नलिकेची कामे वितरण व्यवस्थेसह पूर्ण होणार असल्याचे आमदार गोरे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी जिहेकठापूर योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी लागणारा ६४७ कोटींचा निधी देण्याची ग्वाही दिली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राहुल कुल उपस्थित होते.

फोटो :

जिहे-कठापूर योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करावा या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना दिले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल उपस्थित होते.

Web Title: Include Jihekathapur in Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.