लसीचे डोस वाढवा अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:35 AM2021-08-01T04:35:42+5:302021-08-01T04:35:42+5:30

वडूज : वडूजमध्ये सध्या अगदी कासवगतीने लसीकरण सुरू आहे. चार दिवसातून एकदा फक्त ८० ते १०० डोस येत आहेत ...

Increase the dose of the vaccine otherwise there will be a bombing movement | लसीचे डोस वाढवा अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करणार

लसीचे डोस वाढवा अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करणार

Next

वडूज : वडूजमध्ये सध्या अगदी कासवगतीने लसीकरण सुरू आहे. चार दिवसातून एकदा फक्त ८० ते १०० डोस येत आहेत तर लस घेण्यासाठी तालुक्यातील चार-पाचशे लोक गर्दी करतात, त्यामुळे लसीकरणाच्या दिवशी उपस्थित असणाऱ्या काही लोकांना लस मिळते तर ७० टक्के लोकांना लस न घेताच परत जावे लागत आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून लसीचे डोस वाढवावेत अन्यथा येत्या चार-पाच दिवसात तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपचे नगरसेवक अनिल माळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनातील अधिक माहिती अशी की, वडूजसारख्या तालुक्याच्या ठिकाणी दररोज सुमारे ५०० डोस देणे गरजेचे असून, यामध्ये प्रथम डोस घेतलेल्या सुमारे १,५०० लोकांना ८५ दिवस उलटून गेले तरीही दुसरा डोस मिळालेला नाही. तसेच पहिल्या डोससाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्याही हजारांच्या घरात आहे. जिल्ह्याच्या ठिकाणाहून नियोजन करणारे अधिकारी जाणूनबुजून कोणताही निकष न लावता वडूजला कमी प्रमाणात डोस उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे वृद्ध व अपंगांना लसीसाठी महिनाभर हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून लसीकरण केंद्र तसेच लसीकरणाला येणाऱ्याची संख्या विचारात घेऊन वडूज येथे आरोग्य विभागाची स्वतंत्र यंत्रणा लावून जास्तीत जास्त लस देण्याचे प्रयत्न करावेत. आमच्या या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास नजीकच्या काळात आम्हाला शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. आमच्या या मागणीचा सारासार विचार करण्यात यावा अन्यथा येत्या चार ते पाच दिवसात तहसीलदार कार्यालयासमोर बोबाबोंब आंदोलन करणार असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जयवंत पाटील, नियोजन सभापती प्रदीप खुडे, शशिकांत पाटोळे, सोमनाथ जाधव, संजय काळे आदी उपस्थित होते.

(चौकट)

नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपची सत्ता...

तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरातील नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षासोबत भाजपच्या नगरसेवकांची अभेद्य युती असूनही कोरोना महामारीच्या काळात ठोस अशी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. केंद्रात एकमेव भाजप तर राज्यात राष्ट्रवादीसोबत काँग्रेस अशी सत्ता आहे. तर वडूज नगर पंचायतीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्रित सत्तेवर असूनही या काळात जनतेकडे कानाडोळा केला जातो, याला सर्वस्वी जबाबदार कोण, असा प्रश्न येथील नागरिकांमधून विचारला जात आहे.

Web Title: Increase the dose of the vaccine otherwise there will be a bombing movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.