उत्पादन घटल्याने फुलांच्या दरात वाढ

By admin | Published: December 23, 2014 10:56 PM2014-12-23T22:56:26+5:302014-12-23T23:51:28+5:30

विक्रेते, उत्पादकांचा फायदा : नाताळ, नवीन वर्षामुळे फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी

Increase in flowering costs due to production declines | उत्पादन घटल्याने फुलांच्या दरात वाढ

उत्पादन घटल्याने फुलांच्या दरात वाढ

Next

मिरज : थंडीमुळे फुलांच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारात फुलांचे दर वाढले आहेत. मार्गशीर्ष महिना, लग्नसराई, ख्रिसमस, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर फुलांना मागणी असल्याने दरात ५० टक्के वाढ झाली आहे. फु लांचा दर तेजीत असल्याने व्यापाऱ्यांसह उत्पादकांचा फायदा झाला आहे.
मिरज पूर्व भागात मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन होते. गणेशोत्सवापासून फुलांचे दर तेजीत आहेत. मिरजेत दररोज सकाळी भरणाऱ्या फुलांच्या एकमेव बाजारात खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल सुरू आहे. थंडीमुळे निशिगंध, लिली, गुलाबाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने या फुलांची बाजारात टंचाई असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. थंडीमुळे फुलांचे उत्पादन कमी झाल्याने दर वाढला आहे. फुलांना जोरदार मागणी आहे. मात्र निशिगंध, झेंडू, गलांडा, लिली, गुलाब यासह डच गुलाब, जर्बेरा आदी हरितगृहातील विदेशी फुलांचीही आवक घटली आहे. जिल्ह्यातील तासगाव येथून गुलाब, कर्नाटकातून झेंडू, आष्टा येथून निशिगंधाची फुले, शिरोळ तालुक्यातून फ्रेंच गुलाब, जर्बेरा व ग्लॅडोची फुले विक्रीसाठी येतात. मार्गशीर्ष महिना, लग्नाचा हंगाम, ख्रिसमस, तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फुलांची मागणी असल्याने मिरजेच्या फुलांच्या बाजारात खरेदीसाठी व्यापाऱ्यांची गर्दी आहे. संक्रांतीपर्यंत फुलांचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर व्हॅलेंटाईन डेसाठी गुलाब, डच गुलाबास मोठ्याप्रमाणात मागणी राहणार आहे. मिरजेतून मुंबईला मोठ्याप्रमाणात गुलाबाची निर्यात करण्यात येते. शिरोळ तालुक्यात हरितगृहात उत्पादन होणाऱ्या फ्रेंच गुलाब, जर्बेरा व ग्लॅडो आदी फुलांची मिरजेतून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह, कोकणातील सावंतवाडी, कणकवली, गोव्यातील पणजी, कर्नाटकातील विजापूर व कागवाड येथे मोठ्या प्रमाणात निर्यात होते. फुलांच्या दरवाढीमुळे व्यापारी व फू ल उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. फुले महागल्याने हारांच्या दरातही वाढ झाली आहे. किमान ५० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत फुलांच्या हारांची किंमत आहे. (वार्ताहर)



मिरजेतील फुलांचे दर
निशिगंध - १५० रुपये किलो
झेंडू - ६० रुपये
गलांडा - ५० रुपये किलो
गुलाब - ३०० रुपये शेकडा
जर्बेरा - १० फुलांची पेंडी ३० रुपये
फ्रेंच गुलाब - २० फुलांची पेंडी १५० रुपये

Web Title: Increase in flowering costs due to production declines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.