‘महानंद’कडून दूध खरेदी दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:57 AM2021-02-23T04:57:06+5:302021-02-23T04:57:06+5:30
फलटण : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने (महानंद) २१ फेब्रुवारीपासून दूध खरेदी दरात वाढ केली आहे. त्यामुळे राज्यातील ...
फलटण : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने (महानंद) २१ फेब्रुवारीपासून दूध खरेदी दरात वाढ केली आहे. त्यामुळे राज्यातील संबंधित दूध पुरवठादार संघांनी जास्तीत जास्त दुधाचा पुरवठा करावा, असे आवाहन ‘महानंद’चे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी केले आहे.
उपाध्यक्ष पवार म्हणाले, ‘महानंद व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार २१ फेब्रुवारीपासून महानंद गोरेगाव व अन्य युनिटसच्या ठिकाणी गाय दूध पुरवठा करणाऱ्या संघांना दूध खरेदी बेसिक दर २८ रुपये प्रति लिटरमध्ये १ रुपया वाढ करून २९ रुपये (३.५ व ८.५ साठी) करण्यात येत आहे. अधिक २.५ रुपये वरकड खर्च असे मिळून ३१ रुपये ५० पैसे प्रति लिटर दर देण्यात येणार आहे. याशिवाय वाहतूक भाडेही देण्यात येणार आहे.
प्रति पॉईंट वाढीव फॅटसाठी २० पैसे, वाढीव एसएनएफकरिता १० पैसे दूध महासंघाच्या प्रचलित नियमानुसार अदा करण्यात येणार आहेत. उत्तम प्रतीचे, स्वच्छ, शुद्ध व निर्भेळ गाय दुधाचा पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.
.................................................