रुग्णांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:10 AM2021-03-13T05:10:01+5:302021-03-13T05:10:01+5:30
..... कचऱ्यामुळे दुर्गंधी सातारा : येथील समर्थ मंदिर ते पोवई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यात लोकांकडून ओला ...
.....
कचऱ्यामुळे दुर्गंधी
सातारा : येथील समर्थ मंदिर ते पोवई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यात लोकांकडून ओला कचरा टाकण्यात येत आहे. खराब अन्नपदार्थ, मृत जनावरे, आदी कचरा ओढ्यात टाकला जात असल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा नागरिकांना त्रास होत आहे.
.....
दुभाजकांत गवत वाढले
सातारा : शहरातील मुख्य रस्त्यांमध्ये असलेल्या दुभाजकातील गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या गवताकडे पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. पालिकेच्या वतीने गवत काढण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
.....
दुचाकी चोऱ्यांमध्ये वाढ
फलटण : परिसरात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होऊ लागली आहे. तसेच शहर व परिसरात बेवारस दुचाकी आणि चारचाकी सापडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.