कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तपासण्या वाढवा : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:45+5:302021-04-03T04:35:45+5:30
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग असलेले रुग्ण आढळत आहे. त्यामुळे जे निर्बंध लावले आहेत ते अधिक कडक करावेत. ...
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग असलेले रुग्ण आढळत आहे. त्यामुळे जे निर्बंध लावले आहेत ते अधिक कडक करावेत. तसेच स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढवून कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढवा, अशा सूचना ही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आयोजित मीटिंगदरम्यान देण्यात आल्या.
पाटील म्हणाले, शासनाने व प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. मास्क घालणार नाहीत अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच लग्नसमारंभावर लक्ष ठेवावे. तसेच रात्री ८ नंतर ५ पेक्षा अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत याचीही दक्षता पोलिसांनी घ्यावी.
लग्नसमारंभ, बार, रेस्टॉरंट यांच्यावर पोलीस विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. ज्या ठिकाणी नियमांचे पालन होणार नाही तेथे तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री देसाई यांनी या बैठकीत सांगितले.
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढविण्यासाठीचा प्रस्ताव द्यावा, या लॅबसाठी केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या बैठकीत सांगितले.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण यांनी उपयुक्त अशा सूचना केल्या. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.