रुसव्या-फुगव्यामुळे नेत्यांची वाढली डोकेदुखी

By admin | Published: January 19, 2017 12:30 AM2017-01-19T00:30:04+5:302017-01-19T00:30:04+5:30

चौरंगी लढतीची शक्यता : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाल्लेकिल्ल्यात भाजप-शिवसेनेची खळबळ

The increased headaches of leaders due to hybridism | रुसव्या-फुगव्यामुळे नेत्यांची वाढली डोकेदुखी

रुसव्या-फुगव्यामुळे नेत्यांची वाढली डोकेदुखी

Next


विठ्ठल नलावडे ल्ल कातरखटाव
निमसोड, ता. खटाव जिल्हा परिषद गटासाठी यावेळी ओबीसी महिला व पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण पुरुष तर निमसोड गणासाठी सर्वसाधारण महिला असे चिठ्ठ्या काढून आरक्षण निघाल्यामुळे निमसोड गटात ओबीसी प्रवर्गाचे वर्चस्व राहणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
खटाव तालुक्यातील एकमेव निमसोड गट असा आहे की, ज्याची मतदार संख्या ४४ हजारांच्या दरम्यान आहे. इतर जिल्हा परिषद गटाच्या लोकसंख्येपेक्षा दहा हजाराने जास्त आहे. या गटामध्ये कातरखटाव व निमसोड गणाचा समावेश आहे. परंतु वडूज नगरपंचायत झाल्यामुळे गणांची फेररचना होऊन वाकेश्वर, पेडगाव, गणेशवाडी, सातेवाडी ही चार गावे कातरखटाव गणामध्ये तर येलमरवाडी, ऐनकूळ, कणसेवाडी ही गावे कातरखटाव गणातून कमी होऊन निमसोड गणामध्ये समाविष्ट झाली असून, याचा परिणाम निवडणुकीचा खर्च वाढवण्यावर व लोकमताचा कल अनिश्चित झाला आहे.
आजपर्यंत निमसोड गटामधून अरुणराव बागल यांचे नेतृत्व हरपल्यानंतर निमसोड या नगरीतील रणजितसिंह देशमुख व नंदकुमार मोरे हे या गटाची धुरा सांभाळत आहेत. तशातच आमदार जयकुमार गोरे यांच्या उदयानंतर या गटामध्ये काँग्रेसचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे. निमसोडचे तिसरे उमदे नेतृत्व काकासाहेब मोरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे या गटात काँग्रेसची एक बाजू भक्कम झाली आहे. तसेच माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी राष्ट्रवादीला ‘माँ तुझे सलाम’ करीत सत्ताधारी भाजपमध्ये गेल्यामुळे आत्ता त्यांनी सत्तेच्या माध्यमातून विकासकामांचा सपाटा लावल्यामुळे भाजपला नवसंजीवनी मिळत आहे, हे खरे असले तरी या गटामध्ये चौथा राजकीय गट सक्रिय झाला आहे.
अशातच राष्ट्रवादीने वडूजला रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांमध्ये रणसिंग फुंकून जोश आणल्यामुळे जिल्हा परिषद गटासाठी इच्छुकांमध्ये जिल्हा बँकेचे संचालक अर्जुनभाऊ खाडे यांच्या स्नुषा कल्पना खाडे व तडवळेच्या सरपंच छाया पाटील यांनी तिकिटासाठी मागणी केली आहे.
कातरखटाव गणासाठी सरपंच तानाजीशेठ बागल यांच्या नावाचा बोलबाला चालू असून, तिकिटासाठी ते तुल्यबळ दावेदार आहेत. शेखर गोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
काँगेसच्या तंबूमध्ये आमदारांचा संपर्क थोडाफार थंडावला आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद गटासाठी ऐनकूळचे अर्जुन खाडे , दमणशेठ यांच्या पत्नी जगुबाई खाडे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा चालू आहे. त्यामुळे अर्जुन व दमणशेठ यांनी समर्थकांची फळी निर्माण केल्यामुळे ऐनकूळ गावात काँगेस-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच दिसून येणार आहे. निमसोड गणासाठी पिंटू ऊर्फ चाचा काकासाहेब मोरे यांच्या पत्नी मिनाक्षी मोरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे त्यांनी गणामध्ये संपर्क दौरा वाढवला आहे.
भाजपमध्ये नेहमीप्रमाणे प्रचारात आघाडीत व कार्यकारिणीची जमवाजमव करण्यात माहीर असणारे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी तालुक्याच्या ठिकाणी निमसोड व कातरखटाव गट व गणामध्ये मेळावे घेऊन ‘एकला चलो रे ’चा संदेश कार्यकर्त्यांना देत आहेत. वडूज नगरपंचायतीमध्ये मिळालेल्या यशामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे. भाजप ताफ्यात जिल्हा परिषदसाठी बनपुरीचे नाना पुजारी हे इच्छुक असून, कातरखटाव गणासाठी बोंबाळेचे प्रसाद निंबाळकर व निमसोड गणामध्ये अंकुश घाडगे यांच्या पत्नी इच्छुक आहेत. परंतु एकूण परिस्थिती पाहता डॉ. येळगावकर यांनी शिवसेनेबरोबर युती करून
निवडणूक लढवावी, असा सूर उमटत आहे.
शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख व त्यांना मिळत असलेली पालकमंत्री विजय शिवतारे यांची साथ व तारळीच्या पाण्याचा बोलबाला त्यामुळे प्रचारात सेनेचीच आघाडी दिसून येत आहे. गावोगावच्या कार्यकर्त्यांना भेटून संपर्क वाढल्याचे दिसून येत आहे. मतदार संघामध्ये जातनिहाय लोकसंख्या वंजारी समाजाची असल्यामुळे व निमसोड गटासाठी ओबीसी महिला असल्याने पक्षांची करडी नजर या लॉबीवर लागून राहिल्याचे चित्र आहे.

Web Title: The increased headaches of leaders due to hybridism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.