कोयना धरणात आवक वाढली; पाणीसाठा १३.६३ टीएमसी

By नितीन काळेल | Published: July 2, 2023 02:35 PM2023-07-02T14:35:09+5:302023-07-02T14:35:29+5:30

जिल्ह्यात आठ दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. सुरुवातील पूर्व तसेच पश्चिम भागात पाऊस पडू लागला.

Increased inflow into Koyna Dam; Water storage 13.63 tmc | कोयना धरणात आवक वाढली; पाणीसाठा १३.६३ टीएमसी

कोयना धरणात आवक वाढली; पाणीसाठा १३.६३ टीएमसी

googlenewsNext

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून कोयना धरणक्षेत्रातही जोर आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास धरणात १३.६३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर नवजाला सर्वाधिक १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आठ दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. सुरुवातील पूर्व तसेच पश्चिम भागात पाऊस पडू लागला. यामुळे अनेक दिवस प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला. पण, मागील चार दिवसांपासून पश्चिमेकडेच पावसाचा जोर आहे. पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजासह महाबळेश्वरलाही सतत पाऊस पाडत आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही अवघड झालेले आहे.

पश्चिम भागातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी आदी प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाची हजेरी आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर नवजाला १३० आणि महाबळेश्वर येथे ६६ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. एक जूनपासूनचा विचार करता महाबळेश्वरला सर्वाधिक ८७४ मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे ५३६ आणि नवजाला ७६१ मिलीमीटरची नोंद झाली आहे. 

सततच्या पावसामुळे कोयना धरणातील पाण्याची आवकही वाढली आहे. रविवारी सकाळी ९ हजार ७३७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १३.६३ झालेला. तर धरणाच्या पायथा वीजगृहातील संपूर्ण विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. दरम्यान, पूर्व भागात पाऊस नसल्याने पेरणी रखडली आहे. तर पश्चिम भागात पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी भात लागणीसाह पेरणीची तयारी केली आहे. सध्या शेतकऱ्यांचे लक्ष पाऊस उघडीप कधी देतो याकडे आहे.

सातारा शहरात पाऊस सुरूच...
सातारा शहरात मागील आठ दिवसांपासून पाऊस पडत आहे. दररोज सकाळी पावसाची हजेरी लागत आहे. यामुळे मॉर्निंग वॉकवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर दिवसभरही पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. यामुळे सातारकर आठ दिवसांपासून चिंब होऊन जात आहेत.

Web Title: Increased inflow into Koyna Dam; Water storage 13.63 tmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.