वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात जाणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:54 PM2019-04-25T23:54:01+5:302019-04-25T23:54:06+5:30

अजित जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात मंगळवारी लोकसभेसाठी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान झाले. राष्ट्रवादी व शिवसेनेसह ...

The increased percentage of the person will go to Parda! | वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात जाणार !

वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात जाणार !

Next

अजित जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात मंगळवारी लोकसभेसाठी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान झाले. राष्ट्रवादी व शिवसेनेसह सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. वाई विधानसभा मतदार संघासाठी महाबळेश्वर तालुक्यातून टक्का वाढला असला तरी तो उदनयराजे भोसले की नरेंद्र पाटील या दोघांपैकी कोणच्या पारड्यात जाणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात सलग दहा वर्षेे राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे उदयनराजे भोसले यांना मानणारा वर्गही येथे मोठ्या प्रमाणात होता. परिणामी महाबळेश्वर तालुक्यातून उदयनराजे यांना सलग दोन वेळा चांगले मताधिक्य मिळाले. परंतु गत विधानसभेच्या निवडणुकीवेळी महाबळेश्वर तालुक्यातील काँग्रेसचे नेते व नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यात कॉँग्रेस बॅकफूटवर गेली तर शिवसेनेला उभारी मिळाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे कुमार शिंदे यांनी पालिकेची निवडणूक झाल्यावर भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दोन दिग्गज कार्यकर्त्यांनी पक्षांतर केल्याने शहरात राष्ट्रवादीची पिढेहाट झाली. मात्र, ग्रामीण भागात बाळासाहेब भिलारे, राजेंद्र राजापुरे यांनी राष्ट्रवादीकडे सत्ता कायम ठेवली आहे.
असे असले तरी लोकसभेची रणधुमाळी सुरू झाल्यापासून दोन्ही उमेदवारांनी सभा, बैठका व गाठीभेटी घेऊन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. महाबळेश्वर शहरात जरी कॉँग्रेस व राष्ट्रवादी बळकट नसली तरी उदयनराजेंना मानणारा वर्ग मोठा आहे. तर दुसरीकडे नरेंद्र पाटील यांच्यासाठी सेना व भाजप कार्यकर्त्यांनी झटून काम केले आहे. जिल्ह्यात वाई मतदार संघासाठी महाबळेश्वर तालुक्यातून चांगले मतदान झाले आहे. मतदारराजाने आपला कौल मतदानाच्या रुपात दिला आहे. परंतु हा कौल युती कि आघाडी या पैकी कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आह

विधानसभेत जागा कोणाच्या वाट्याला
विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे वाई मतदारसंघातून मकरंद पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, भाजप-शिवसेने युतीतर्फे ही जागा शिवनेतेच्या कोट्यात आहे. विधानसभेत जाण्यास उत्सूक असलेल्या मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी तयारीही सुरू केली मात्र, जागा वाटपामध्ये महायुतीकडून ही जागा नेमकी कोणाला जाणार याकडे लक्ष लागले आहे.

‘आमचं ठरलंय’चीच चर्चा अधिक
शिवसेनेचा व भाजपचा प्रचार ‘ना प्रचार ना बुथ आमचं ठरलंय,’ अशा पद्धतीने सुरू होता. काही ठिकाणी धनुष्यबाण तर मिशावर हात फिरवून ‘आमचं ठरलंय’ असंही तरुण पिढी सांगत होती. परंतु महाबळेश्वर तालुक्याचे राजकारण भल्याभल्यांना समजले नाही, यामध्ये कोण जिंकेल कोण हरेल, हे मात्र २३ मे रोजी कळेल, अशी परिस्थिती आहे.

Web Title: The increased percentage of the person will go to Parda!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.