फळांना वाढती मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:39 AM2021-03-05T04:39:54+5:302021-03-05T04:39:54+5:30
सातारा : थंडीचा कडाका संपल्यानंतर जिल्ह्यात आता उन्हाची लाट वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने ...
सातारा : थंडीचा कडाका संपल्यानंतर जिल्ह्यात आता उन्हाची लाट वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने शीतयपेयांबरोबरच थंडावा देणाऱ्या देशी-विदेशी फळांना मागणी वाढू लागली आहे.
रोहिदास जयंती उत्साहात
सातारा : जिल्हा संत रोहिदास चर्मकार संस्थेच्या वतीने संत रोहिदास महाराज यांचा ६२३ वा जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करण्यात आले. या वेळी संजय गडकरी, रोहिदास भंडारे, विलास कांबळे, जगदीश कारंडे, उत्तम माने, प्रियांका शिंदे, प्राजक्ता चव्हाण उपस्थित होते.
पथदिवे बसवण्याची मागणी
सातारा : शहराची हद्दवाढ झाल्याने त्रिशंकू भागातील गोडोली, साईमंदिर झोपडपट्टी, मोरे कॉलनी, यशवंत कॉलनी, ठक्कर सिटी, अजंठा चौक परिसरात पथदिवे बसविण्यात यावेत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या हद्दवाढीनंतर तरी या भागाचे प्रश्न निकाली निघावेत, अशी स्थानिकांची इच्छा आहे.
रक्तदान शिबिरास प्रतिसाद
सातारा : वर्ये येथील अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग व बालाजी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्घाटन डॉ. विलास फरांदे यांच्या हस्ते व निशांत गवळी यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी ६६ विद्यार्थी आणि १५ शिक्षकांनी रक्तदान केले.
मोहित जगतापचे यश
कोरेगाव : भारतीय अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रायपूर छत्तीसगड येथे नुकत्याच पार पडलेल्या ३२ व्या वेस्ट झोन कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून खेळणाऱ्या मोहित जगताप याने २ हजार मीटर धावणे प्रकारात ६.०४ मिनिटांची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. मोहित कोरेगाव तालुक्यातील निगडी गावचा रहिवासी आहे.