सत्तासंघर्षात वाढीव भाग ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:42 AM2021-09-27T04:42:59+5:302021-09-27T04:42:59+5:30

राष्ट्रवादीने आखले डावपेच राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनीदेखील सातारा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली असून, परळी खोऱ्यात शशिकांत ...

An increasing part of the power struggle will be decisive | सत्तासंघर्षात वाढीव भाग ठरणार निर्णायक

सत्तासंघर्षात वाढीव भाग ठरणार निर्णायक

Next

राष्ट्रवादीने आखले डावपेच

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनीदेखील सातारा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली असून, परळी खोऱ्यात शशिकांत शिंदे यांनी केलेली राजकीय पेरणीचा ही तर सुरुवात मानली जात आहे. सातारा पालिकेतही राजेंच्या सत्ताकेंद्राला सुरुंग लावण्यासाठी त्यांनी डावपेच आखले आहेत.

(चौकट)

शिवसेनेला मिळणार उभारी

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व संपर्कमंत्री दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनादेखील निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे; परंतु शिवसेनेकडून अद्याप रणनीती आखण्यात आलेली नाही. प्रभावी नेतृत्व न मिळाल्याने सेनेची आजवर पालिका निवडणुकीत परफट झाली. मात्र, आता गृहराज्यमंत्र्यामुळे सेनेला उभारी मिळू शकते.

(चौकट)

भाजपचा स्वबळाचा नारा

गेल्या निवडणुकीत भाजपच्या सहा नगरसेवकांनी सातारा पालिकेत विजय मिळवून दोन्ही राजेंना हादरा दिला. यंदा दोन्ही राजे भाजपमध्ये असले तरी ते स्वतंत्र आघाड्यांमधून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील बैठकीत पालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे.

(चौकट)

नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची गरज

- आरक्षणाचा फटका यंदा विद्यमान काही नगरसेवकांना बसू शकतो. त्यामुळे सत्तेच्या चाव्या आपल्या हाती ठेवण्यासाठी सत्ताधारी आघाडी व राजकीय पक्षांना यंदाचा सामना तितकासा सोपा मुळीच नसणार आहे.

- गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत सत्ताधारी आघाडीत व विरोधकांमध्ये अनेक राजकीय समीकरणे बदलली. याचा फटकादेखील यंदा दोन्ही आघाड्यांना बसू शकतो.

- याशिवाय ज्यांना तिकीट मिळणार नाही असे उमेदवार व अंतर्गत गृहकलहामुळे नाराज झालेली मंडळी यंदा वेगळी वाट शोधू शकते.

- त्यामुळे दोन्ही राजेंना निवडणुकीचा सामना जिंकण्यासाठी यंदा नव्या दमाची फळी उभी करावी लागणार असून, त्यांची चाचपणीही सुरू झाली आहे.

(चौकट)

वाढीव भागात असे असेल चित्र

- सातारा शहर ४०-

माळवाडी कोपरा, पेढ्याचा भैरोबा, गडकर आळी, दरेखुर्द, अंजली कॉलनी, अर्कशाळा नगर, रांगोळी कॉलनी, फाशीचा वड परिसर, मोळाचा ओढा परिसर, करंजे ग्रामीण : ५

- पिरवाडी, उत्तेकरनगर, म्हाडा कॉलनी, शाहूनगर, कोडोली, कोडोली, विलासपूर, इंद्रनगर झोपडपट्टी, मंगळाई कॉलनी, चार भिंती पिछाडी : ३

- एकण प्रभाग २४

- एकूण नगरसेवक ४८

- २०११च्या जनगणेनुसार लोकसंख्या १,२२,१९५

- हद्दवाढीमुळे वाढलेली लोकसंख्या : ६०,३७३

लोगो : सातारा पालिका फोटो

फोटो : २६ सातारा पालिका मॅप

Web Title: An increasing part of the power struggle will be decisive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.