विद्यार्थ्यांची जडण-घडण करण्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:46 AM2021-09-10T04:46:30+5:302021-09-10T04:46:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘कोरोनाकाळात विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. त्यांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण करण्याचे आव्हान ...

To inculcate students | विद्यार्थ्यांची जडण-घडण करण्याचे

विद्यार्थ्यांची जडण-घडण करण्याचे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ‘कोरोनाकाळात विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. त्यांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण करण्याचे आव्हान शिक्षकांपुढे आहे. येणाऱ्या काळात ते शिक्षकांना समर्थपणे पेलावे लागेल,’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. गजानन भोसले यांनी केले.

सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने संभाजीनगर, सातारा येथील राष्ट्रभाषा भवनात शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य हिंदी महामंडळाचे उपाध्यक्ष व जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष ता. का. सूर्यवंशी होते; तर सांगली जिल्हा मंडळाचे कार्यवाह आ. तु. पाटील, कोल्हापूर जिल्हा मंडळाचे अध्यक्ष संजय गावडे, महामंडळाचे कोषाध्यक्ष सुधाकर माने, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज मुजावर व इकबाल मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

ता. का. सूर्यवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षकांचे स्थान आणि समाजाकडून त्यांच्या बद्दलच्या अपेक्षा विषद करून डॉ. राधाकृष्णन यांच्यासारखे आपले आचार-विचार उच्च ठेवण्याचे आवाहन केले. शिक्षक दिन कार्यक्रमात जिल्ह्यातून आलेल्या ८७ शिक्षकांचा श्रीफळ व स्नेहवस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ११ तालुकाध्यक्षांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. सुषमा माने यांनी आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह. रा. सूर्यवंशी व संजय शिंदे यांनी केले, तर संयोजक म्हणून विनायक बगाडे, नेताजी ननावरे, नवनाथ शिंदे, सुनंदा शिवदास यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी छाया कदम, नारायण शिंदे, मीनाक्षी बडिगार, जयश्री निकम, सुरेखा गोसावी, धोंडिबा खरात, मंगेश पवार, अनिल वीर, मारुती शिवदास यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो : ०९ शिक्षक दिन

Web Title: To inculcate students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.