निढळमध्ये दहा वर्षांनंतर सत्तांतर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:39 AM2021-01-19T04:39:29+5:302021-01-19T04:39:29+5:30
खटाव : तालुक्यात राष्ट्रवादीच्या हाती असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर घडवून आणणे हाच ध्यास मनी घेऊन मैदानात उतरलेल्या आमदार शिंदे व ...
खटाव : तालुक्यात राष्ट्रवादीच्या हाती असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर घडवून आणणे हाच ध्यास मनी घेऊन मैदानात उतरलेल्या आमदार शिंदे व समर्थकांनी काही ग्रामपंचायतींमध्ये सत्ता प्रस्थापित करत, अनेक वर्षांपासून असणारे एकाच पक्षाचे जोखड मोडून नवीन बदलाची नांदी स्वीकारली.
खटाव तालुक्यातील नेर, निढळ, जांब, जाखणगाव, दरुज ग्रामपंचायतींमध्ये आमदार महेश शिंदे गटाच्या पॅनेलने आघाडी घेत सत्ता प्रस्थापित केली आहे. निढळमध्ये दहा वर्षांनंतर सत्तांतर घडविण्यात यश आले आहे. ११ पैकी ९ जागा जिंकत माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी गटाला दोन जागांवर रोखत मोठा धक्का देत सत्तांतर घडवले, तर जाखणगाव, जांब, दरुजमध्ये आमदार शशिकांत शिंदे गटाला धक्का बसला. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या विजयानंतर खटावमधील आमदार समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. खटावचे सरपंच नंदकुमार वायदंडे, राहुल पाटील, उपसरपंच अमर देशमुख, अशोक कुदळे, दीपक घाडगे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदींनी जाखणगाव, जांब आदी गावांतील विजयी उमेदवारांचे काैतुक केले.
फोटो..
१८खटाव
कॅप्शन : खटावमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर आमदार महेश शिंदे समर्थकांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.