स्वातंत्र्यदिनी बोंबाबोंब आंदोलन : मुळीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:44 AM2021-08-13T04:44:42+5:302021-08-13T04:44:42+5:30
दहिवडी : पिंगळी तलाव, तसेच भराव्यावरील काटेरी झाडे-झुडपे, काढण्यासाठी संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्राहक प्रबोधन समितीमार्फत २७ जुलैला निवेदन ...
दहिवडी : पिंगळी तलाव, तसेच भराव्यावरील काटेरी झाडे-झुडपे, काढण्यासाठी संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्राहक प्रबोधन समितीमार्फत २७ जुलैला निवेदन दिले होते. मात्र, पाटबंधारे विभागाने या गोष्टीकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे रविवार, दि. १५ रोजी पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर वाघमोडेवाडी, मोरेमळा, दहिवडी व गोंदवले गावातील ग्रामस्थांना सोबत घेत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्राहक प्रबोधन समितीचे माण-खटावचे अध्यक्ष राजू मुळीक यांनी दिला.
ब्रिटिशकालीन पिंगळी तलावातील व तलावाच्या भराव्यावरील काटेरी झाडेझुडपे यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता हा भरावा पोकळ होऊन तलावाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. परिणामी गोंदवले, वाघमोडेवाडी, मोरेमळा, पिंगळी, दहिवडी गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्राहक प्रबोधन समितीमार्फत मुळीक यांनी निवेदनाद्वारे झाडे व झुडपे काढण्याची मागणी केली होती. मात्र, पाटबंधारे विभागाने या रास्त मागणीकडे दुर्लक्ष करत अजून कोणतीच कार्यवाही न केल्याने ग्राहक प्रबोधन समिती आता आक्रमक झाली आहे.