सत्ताधाऱ्यांना डावलून भणंगमध्ये सर्व जागांवर अपक्षांचा झेंडा!

By दीपक देशमुख | Published: October 17, 2022 04:44 PM2022-10-17T16:44:36+5:302022-10-17T16:44:57+5:30

नवीन बदलाची चर्चा, नेते म्हणतात अपक्षही आमच्याच विचाराचे.

Independents' flag in all places in Bhanang leaving the ruling party in Satara | सत्ताधाऱ्यांना डावलून भणंगमध्ये सर्व जागांवर अपक्षांचा झेंडा!

सत्ताधाऱ्यांना डावलून भणंगमध्ये सर्व जागांवर अपक्षांचा झेंडा!

googlenewsNext

सातारा : भणंग ग्रामपंचायतीत आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचे समर्थक मच्छिंद्र क्षीरसागर यांच्या पाडळेश्वर पॅनेलला मतदारांनी नाकारले असून थेट सरपंच पद व  अपक्षांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली आहे.पॅनेलचा फक्त एक उमेदवार निवडून आला आहे. 

आमदार शिवेंद्रराजे भोसले, वसंतराव मानकुमरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे मच्छिंद्र क्षीरसागर यांनी भणंग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पॅनलकडून सात उमेदवार उभे केले होते. यापैकी सहा उमेदवारांचा अपक्षांनी पराभव करून भणंगमध्ये इतिहास घडवला आहे. थेट सरपंच पदासाठी अपक्ष गणेश साईबाबा जगताप यांनी मच्छिंद्र क्षीरसागर यांच्या अधिकृत पॅनेलच्या सुहास जाधव यांचा पराभव केला. 

प्रभाग १ मध्ये संगीता सत्यवान जाधव - अपक्ष (२०३), प्रभाग २ मध्ये पाडळेश्वर पॅनेलचे विकास रमेश देशमुख (१८२), श्रीमती रंजना नारायण जाधव अपक्ष (२३२), सौ. मथुरा नारायण जाधव अपक्ष (२५१) यांनी विजय मिळवला. प्रभाग ३ मध्ये सचिन भोसले (१३९), श्रीमती हाफीजा जमाल (१५४) यांनी विजय मिळवला.  

निवडून आलेल्या सरपंचासह सर्वच अपक्ष आमचेच
निवडून आलेले अपक्ष आमच्या विचाराचे असल्याचा दावा भाजप व राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. सर्व नवनर्वाचित सरपंच व सदस्य याबाबत काय भुमिका घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Independents' flag in all places in Bhanang leaving the ruling party in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.