आईचं दूध पिताना ठसका लागून चिमुकलीचा मृत्यू, सातारा जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

By दत्ता यादव | Published: December 27, 2022 02:57 PM2022-12-27T14:57:39+5:302022-12-27T15:53:22+5:30

सातारा : आई अंगावरील दूध पाजत असताना श्वसन नलिकेत दूध अडकून अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कऱ्हाड तालुक्यातील कवठे येथे ...

Infant dies after choking while drinking mother milk, Incidents in Satara district | आईचं दूध पिताना ठसका लागून चिमुकलीचा मृत्यू, सातारा जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

संग्रहीत फोटो

googlenewsNext

सातारा : आई अंगावरील दूध पाजत असताना श्वसन नलिकेत दूध अडकून अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कऱ्हाड तालुक्यातील कवठे येथे घडली.

याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वाती कृष्णत यादव (रा. कवठे, ता. कऱ्हाड) यांनी अडीच महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला. रात्री नेहमीप्रमाणे मुलीला त्या अंगावरील दूध पाजत होत्या. त्यावेळी मुलीच्या श्वसन नलिकेत दूध गेल्याने तिला ठसका लागला. यातच तिला उलटी झाल्याने ती बेशुद्ध पडली. 

अडीच महिन्यांच्या चिमुकलीला घरातल्यांनी तातडीने कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मुलीचं बारसंही घातलं नव्हतं. चिमुकलीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने यादव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची उंब्रज पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, पोलिस नाईक वैभव डोंगरे हे अधिक तपास करीत आहेत. 

दरम्यान, सातारा शहरामध्ये सोमवारी एक वर्षाच्या मुलीचा घशात चॉकलेट अडकून मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे. 

Web Title: Infant dies after choking while drinking mother milk, Incidents in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.