कऱ्हाड तालुक्यात संक्रमण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:21 AM2021-03-30T04:21:50+5:302021-03-30T04:21:50+5:30
कोरोनाची दुसरी लाट भयावह दिसून येत आहे. संक्रमणाचा वेगही जास्त आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट झाले असून, संक्रमण रोखण्यासाठी हरतऱ्हेने ...
कोरोनाची दुसरी लाट भयावह दिसून येत आहे. संक्रमणाचा वेगही जास्त आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट झाले असून, संक्रमण रोखण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न होत आहेत. मात्र, तरीही रुग्णांची संख्या वेगाने वाढताना दिसते. एकीकडे लसीकरणाने वेग घेतला असताना, दुसरीकडे बाधितांचे प्रमाण कित्येक पटींनी वाढत आहे. एकूणच कोरोनाचा लढा सध्या निर्णायक टप्प्यावर आहे. बेजबाबदारपणा प्रत्येकासाठी धोक्याचा असून, मास्क वापर, सोशल डिस्टन्सिंगसह कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करण्यावर प्रत्येकाने भर देणे गरजेचे आहे. आरोग्य विभागानेही सध्या तपासणीचा वेग वाढविला असून, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. तपासणी करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाने सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या नोंदीनुसार कऱ्हाड शहरातील सोमवार पेठेत १, मंगळवार पेठ १, शुक्रवार पेठ १, राजारामनगर १ आणि इतर २ तसेच ग्रामीण भागात विद्यानगरला १, मलकापूर ४, तांबवे १, घोगाव, १, रेठरे खुर्द २, चरेगाव १, उंब्रज १, तारूख १, कासारशिरंबे ३, जुळेवाडी ४, मसूर २, पाल ३, कोळेवाडीत १ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे.