जाधववाडीत रानडुकरांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:33+5:302021-07-17T04:29:33+5:30

वाठार स्टेशन : वाठार स्टेशन परिसरातील डोंगरदरीला रानडुकरांचा मोठा वावर असून, या रानडुकरांपासून लगतच्या शेतातील फार मोठ्या ...

Infestation of cows in Jadhavwadi | जाधववाडीत रानडुकरांचा उपद्रव

जाधववाडीत रानडुकरांचा उपद्रव

googlenewsNext

वाठार स्टेशन : वाठार स्टेशन परिसरातील डोंगरदरीला रानडुकरांचा मोठा वावर असून, या रानडुकरांपासून लगतच्या शेतातील फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

वाठार स्टेशनच्या पूर्व बाजूला असलेल्या जाधववाडी, फड तरवाडी, दाणे वाडी, विखळे, नलवडेवाडी या गावाच्या लगत जोगमठ, महादेव मंदिर, ढगा या नावाची मोठे डोंगर आहेत. हे डोंगर वन विभागाच्या ताब्यात असून, या ठिकाण मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. सध्या येथे जंगल तयार झाले असल्याने या डोंगरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. यात रानडुकरांचे मोठे कळप पाहावयास मिळत आहेत. दिवसभर डोंगरदरीला असलेले हे रानडुकराचे कळप रात्रीच्या वेळी शेतात येऊन पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत. सध्या भुईमूग, ऊस, वाटाणा या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी शेताच्या बाजूने तारा बांधल्या आहेत, तरी त्यातूनही ही रानडुकरे शेतात प्रवेश करत पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत. दरवर्षीच्या या नासाडीमुळे शेतकरी त्रस्त झाला असून, वनविभागाने डोंगराभोवती संरक्षित जाळी लावावी, अथवा शेतकऱ्यांना शेताभोवती जाळी लावण्यासाठी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी येथील लोकांतून होत आहे.

१६वाठार स्टेशन

जाधववाडी येथील शिवारातील रानडुकरांनी नासाडी केलेला आहे.

Web Title: Infestation of cows in Jadhavwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.