महागाईचा आगडोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:38 AM2021-03-16T04:38:57+5:302021-03-16T04:38:57+5:30
उन्हाच्या झळा सातारा : उन्हाच्या झळा वाढू लागल्याने जिल्ह्यातील विविध वनक्षेत्रांतील वणव्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. वणवे नियंत्रणात आणण्यासाठी ...
उन्हाच्या झळा
सातारा : उन्हाच्या झळा वाढू लागल्याने जिल्ह्यातील विविध वनक्षेत्रांतील वणव्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. वणवे नियंत्रणात आणण्यासाठी वनविभागाला अपयश आले आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक दुर्मिळ वनस्पती आणि जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. वणवे नियंत्रणात येत नसल्याने संबंधित गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समिती व त्या भागात कार्यरत असणारे वनपाल व कर्मचारी नक्की काय करतात? असा सवाल उपस्थित होत आहे.
गैरप्रकारांना आळा
सातारा : राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या माध्यमातून जिल्हा पुरवठा विभागाकडे येणारे धान्य व वितरण व्यवस्थेत सॉफ्टवेअर प्रणालीमुळे आमूलाग्र बदल झाला आहे. सातारा तालुक्यात एससीएम, आसीएमएस आणि एईपीडीएस या सॉफ्टवेअरच्या मदतीने धान्याची उचल व त्याचे वितरण गतीने करण्यास मदत होत आहे.
उत्पादक हवालदिल
सातारा : मागील अनेक दिवसांपासून कोबी, टमाट्याचे दर घसरले असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे उत्पादक हवालदिल झाले असून, त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे कोणतेही पीक आाैषध फवारणीशिवाय येत नाही. महागाईमुळे मजुरीचे दर वाढले आहेत.
फळांना मागणी
सातारा : उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे शरीराला थंडावा देणाऱ्या फळांना मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाला असून, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. उन्हाच्या झळा वाढल्याने जेवण कमी जाणे, थकवा, त्वचा कोरडी पडणे, डोळ्यांची जळजळ होणे अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. आरोग्य सांभाळताना समतोळ आहाराला प्राधान्य दिले जात आहे.
मजुरांचा तुटवडा
सातारा : वाई तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरबरा काढणीची कामे जोमात सुरू आहेत. हळद काढणी व ऊस तोडणीबरोबर ज्वारी, गहू काढण्यासाठी शेतात लगबग चालू झाल्याने मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. मजुरांची वाट पाहत बसण्यापेक्षा ऐकमेा पैरा करण्यावर शेतकऱ्यांचा कल असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.