साताऱ्यात आवक वाढली; कांद्याला २८०० रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:31 AM2021-01-04T04:31:31+5:302021-01-04T04:31:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असून, निर्यात बंदी उठविल्यापासून दरातही वाढ झाली आहे. ...

Inflows increased in Satara; The price of onion is Rs. 2800 | साताऱ्यात आवक वाढली; कांद्याला २८०० रुपये भाव

साताऱ्यात आवक वाढली; कांद्याला २८०० रुपये भाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असून, निर्यात बंदी उठविल्यापासून दरातही वाढ झाली आहे. रविवारी क्विंटलला दीड हजारापासून २८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. या आठवड्यात दरात ५०० रुपयांची वाढ झाली, तर पालेभाज्या अजूनही स्वस्तच असून, शेवगा मात्र तेजीत आहे. हिरव्या मिरचीलाही भाव मिळू लागला आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यातून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होते.

सातारा बाजार समितीत रविवारी एकूण १ हजार २४ क्विंटल शेतमालाची आवक झाली. यामध्ये कांद्याची १२३ क्विंटलची आवक झाली. वांग्याचा दर कमी-जास्त होत असल्याचे दिसून आले. १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर या आठवड्यातही शेवग्याचा दर तेजीत निघाला. हिरव्या मिरचीला १० किलोला ३५० ते ४०० रुपये भाव आला.

तेलाचे दर आणखी वाढले...

मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. आतातर १५ किलोंच्या डब्यामागे १०० ते १५० रुपयांची वाढ झाली. शेंगदाणा तेल २२०० ते २३०० रुपयांपर्यंत मिळत आहे. पामतेल १७०० ते १८००, सोयाबीन १९५० ते २०००, सूर्यफूल तेल डबा २००० ते २१०० पर्यंत मिळत आहे, तर लिटरमागे सरासरी पाच रुपये वाढ आहे.

फळांची आवक चांगली

साताऱ्यात फळांची आवक चांगली आहे. त्यामुळे दर स्थिर आहेत. सफरंचद ८० ते १०० रुपये, तर केळी ३० रुपये डझनपासून मिळत आहे.

आले स्वस्त

भाज्यांच्या दरात चढ-उतार सुरू आहे. गवारला १० किलोला ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. दोडका १५० ते २००, कोबी ३० ते ५० रुपये, कारली २०० ते २५०, टोमॅटोला ४० ते ६० रुपये दर १० किलोला मिळाला. आले स्वस्त असून, क्विंटलला एक हजारपासून १८०० पर्यंत भाव मिळाला.

भाज्यांच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहे. एखाद्या आठवड्यात वांगी महाग होतात, तर दुसऱ्यावेळी अन्य फळभाज्यांचे दर वाढलेले असतात. सध्या टोमॅटो, कोबी, फ्लॉवरचे दर आटोक्यात आहेत.

- ज्ञानेश्वर पवार, ग्राहक

खाद्यतेलाची आवक कमी आहे. त्यामुळे पुरवठा कमी आहे. परिणामी तेलाचे दर वाढत चालले आहेत. कोरोना विषाणूमुळेच ही स्थिती निर्माण झालेली आहे. पुढील महिन्यापर्यंत असेच चित्र राहील.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

बाजार समितीत भाजीपाल्यांची आवक चांगली होत आहे. यामुळे दरात अपेक्षेऐवढी वाढ नाही. कोबी, फ्लॉवर आणि टोमॅटोला भाव कमीच आहे, अशीची स्थिती काही दिवस राहील.

- कोंडिबा काळे, शेतकरी

.....................................................................................................................................................

Web Title: Inflows increased in Satara; The price of onion is Rs. 2800

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.