शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी घेणार पुढाकार : विजय शिवतारे

By admin | Published: October 2, 2016 12:53 AM2016-10-02T00:53:47+5:302016-10-02T00:53:47+5:30

बैठकीत माहिती : शांततेने महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

Initiatives to get education loan: Vijay Shivtare | शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी घेणार पुढाकार : विजय शिवतारे

शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी घेणार पुढाकार : विजय शिवतारे

Next

सातारा : ‘ज्याप्रमाणे बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याबाबत बंधने घालण्यात आली आहेत. त्याप्रमाणे चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देण्याचे बंधन घालणे गरजेचे आहे. मुलांना शैक्षणिक कर्ज मिळाले तर त्यांचे करिअर घडेल. कर्ज दिलेल्यामधील ६० टक्के मुलांनी जरी कर्ज फेडले तरी भरपूर आहे. इतर कर्ज सरकार भरेल. नाहीतर अडचणीत आलेल्या कारखान्यांचे पैसे सरकार भरत असते, असे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चातून गेल्या ५० वर्षांची खदखद बाहेर येत आहे. त्यामुळे मराठा समाजाला या आंदोलनातून आरक्षण मिळाले पाहिजे. साताऱ्यात होणाऱ्या महामोर्चात मराठा बांधवांनी हिंसाचाराला बाजूला ठेवून शांततेत महामोर्चा पार पाडावा,’ असे आवाहन त्यांनी केले.
येथील जिल्हा शासकीय विश्रामगृहात मराठा क्रांती महामोर्चाबाबत मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच संयोजन समितीने मराठा आरक्षणाबाबतच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. शिवतारे म्हणाले, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे, अशी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी बाजू मांडल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सातारा शहरात निघणाऱ्या महामोर्चाला लागणारे सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन शिवतारे यांनी दिले.
मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीच्या सदस्यांनी ही विदारक परिस्थिती बदलण्यासाठी मराठा समाजातील ९० ते ९५ टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विना डोनेशन शिक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली. शिवतारे यांनी आरक्षणामुळे कमी टक्केवारी त्यांना क्लार्क म्हणून काम करावे लागत आहे. त्यानंतर प्रमोशनचीही तशीच विदारक अवस्था आहे. सगळी पडीक कामे आज मराठा समाजातील लोकांना करावी लागत आहेत. (प्रतिनिधी)
५० वर्षांची खदखद बाहेर
महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाची गेल्या ५० वर्षांची खदखद बाहेर येत आहे. त्यामुळे मराठा समाजाला या आंदोलनातून आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी सरकारकडे माझी शिष्टाई सुरू आहे. सातारा येथे होणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.
हुल्लडबाजांना रोखावे
वातावरण निर्मितीसाठी रॅली योग्य आहे; पण काही अतिउत्साही कार्यकर्ते हुल्लडबाजी करू लागले आहेत. चारचाकी व दुचाकीवर झेंडे लावून गाडी आडवी मारणे अशा पद्धतीने अरेरावी करणे चालू आहे. शुक्रवारपासून तक्रारी येत आहेत. आज मी समक्ष दोन ठिकाणी पाहिले त्यांना समजावून सांगितले. आपला अन्यायाविरुद्धचा निषेध मूक महामोर्चा आहे. तेव्हा नीट वागा संयम सोडू नका. प्रसारमाध्यमांनी यासाठी आवाज उठवावा, अशी विनंतीही पालकमंत्र्यांनी केली.

Web Title: Initiatives to get education loan: Vijay Shivtare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.