जखमी बहिरी ससाण्याला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:18+5:302021-02-16T04:39:18+5:30
दरम्यान, या संस्थेतील सदस्यांनी अनेकवेळा जखमी व मानवी वस्तीत आढळलेल्या वन्यप्राणी तसेच पक्ष्यांना उपचार करीत नैसर्गिक अधिवासात सोडले ...
दरम्यान, या संस्थेतील सदस्यांनी अनेकवेळा जखमी व मानवी वस्तीत आढळलेल्या वन्यप्राणी तसेच पक्ष्यांना उपचार करीत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. निसर्गप्रेम व वन्यजिवाच्या संरक्षणासाठी ही संस्था नेहमी कार्यरत असते. त्याबद्दल विभागातून समाधान व्यक्त होत आहे.
रासाटी ते नाणेल जाणाऱ्यां रस्त्यावर शाळकरी विद्यार्थ्यांना जखमी बहिरी ससाणा दिसला. ही माहिती त्या विद्यार्थ्यांनी ‘एक्स्प्लोर कोयना’ या संस्थेच्या राज राठोड यांना दिली. राज राठोड हे पक्षिमित्र असल्यामुळे त्यांनी लगेच गणेश सपकाळ यांना घेऊन त्या जखमी बहिरी ससाण्याला ताब्यात घेऊन प्राथमिक उपचार केले. त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे भरारीही घेता येत नव्हती. राज राठोड व गणेश सपकाळ यांनी त्याला पाणी पाजले. औषधोपचार करून अधिक उपचारासाठी वनविभागाला याबाबतची माहिती दिली.
हेळवाक विभागाचे वनपाल जे. जे. कवर व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी जखमी ससाण्याला ताब्यात घेतले. त्याच्या पंखास इजा झाल्याचे कर्मचा ऱ्यांच्या निदर्शनास आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर उपचार केंद्राकडे पाठविण्यात आले.
निसर्गाचा ऱ्हास सुरू असून, माणसाने स्वार्थासाठी निसर्गावर अतिक्रमण सुरू केले आहे. यामधून पक्षीही सुटत नाहीत. हा निसगार्चा ऱ्हास थांबविण्यासाठी कोयना परिसरात काही निसर्गप्रेमी संस्था काम करत आहेत. त्यापैकी राज राठोड यांची ‘एक्स्प्लोर कोयना’ ही संस्था आहे.
फोटो : १५केआरडी०५
कॅप्शन : संगमनगर धक्का, ता. पाटण येथे जखमी स्थितीत आढळलेल्या बहिरी ससाण्याला युवकांच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले. (छाया : नीलेश साळुंखे)