पर्यटकांना आवरेना मनोºयाचा मोह ! महाबळेश्वरच्या कॅनॉट पिक पॉर्इंटवरील चित्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:14 AM2019-04-08T10:14:46+5:302019-04-08T10:18:42+5:30

महाबळेश्वर : वनविभागाच्या वतीने क्षेत्र महाबळेश्वरनजीक असलेल्या कॅनॉट पिक पॉर्इंटवर सिमेंटचा मनोरा उभारण्यात आला आहे. अर्धवट अवस्थेत असलेल्या या ...

Innovative mindset of tourists! Pictures from Mahabaleshwar's Concot Pick Point | पर्यटकांना आवरेना मनोºयाचा मोह ! महाबळेश्वरच्या कॅनॉट पिक पॉर्इंटवरील चित्र 

पर्यटकांना आवरेना मनोºयाचा मोह ! महाबळेश्वरच्या कॅनॉट पिक पॉर्इंटवरील चित्र 

Next
ठळक मुद्दे धोक्याकडे होतेय दुर्लक्ष 

महाबळेश्वर : वनविभागाच्या वतीने क्षेत्र महाबळेश्वरनजीक असलेल्या कॅनॉट पिक पॉर्इंटवर सिमेंटचा मनोरा उभारण्यात आला आहे. अर्धवट अवस्थेत असलेल्या या मनोºयावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही अनेक पर्यटक धोका पत्करून या मनोºयावर उभे राहून फोटो काढताना दिसत आहेत. 

महाबळेश्वरला निसर्गाचे वरदान लाभले आहे. येथील ब्रिटिशकालीन पॉर्इंट हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र असून, या पॉर्इंटवर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. क्षेत्र महाबळेश्वरनजीक असलेला कॅनॉट पिक पॉर्इंट हा त्यापैकीच एक. या पॉर्इंटवरून निसर्गाचे विलोभनीय दृश्य नजरेस पडते. पर्यटकांना निसर्गाचा हा अद्भूत नजराणा उंचावरून पाहता यावा, यासाठी वनविभागाच्या वतीने काही वर्षांपूर्वी या पॉर्इंटवर सिमेंटचे बांधकाम असलेला तीन मजली मनोरा उभारण्यात आला. परंतु सुरक्षितेतच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना या ठिकाणी अद्याप करण्यात आली नाही. परिणामी अर्धवट स्थितीत असलेला हा मनोरा गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. 

वनविभागाच्या वतीने या मनोºयाभोवती तारेचे कंपाऊंड करून या मनोºयावर न जाण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. याबाबतचा फलकही या मनोºयाजवळ लावण्यात आला आहे. परंतु या पॉर्इंटला भेट देणारे काही हौशी पर्यटक वनविभागाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मनोºयावर जात आहेत. तसेच धोका पत्करून फोटो काढण्याचा मोहही त्यांना आवरता येत नाही. एखादी विपरित घटना घडण्यापूर्वी वनविभागाच्या वतीने याठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
 

कॅनॉट पिक पार्इंटवरील मनोºयावर चढण्यास पर्यटकांना बंदी आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी या मनोºयाला तारेचे कंपाउंडही करण्यात आले आहे. तरीही काही हौशी पर्यटक धोका पत्करून मनोºयावर जातात. अशा प्रकारचे धाडस जर कोणी करत असेल तर, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
- रणजित गायकवाड, वनक्षेत्रपाल, महाबळेश्वर

Web Title: Innovative mindset of tourists! Pictures from Mahabaleshwar's Concot Pick Point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.