रजेवर गेलेल्या डॉक्टरांची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:36 AM2021-05-15T04:36:56+5:302021-05-15T04:36:56+5:30
पत्रकात असे म्हटले आहे की, मसूर प्राथमिक केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. रमेश लोखंडे मसूरसह कोपर्डे हवेली व २३ गावांतील ...
पत्रकात असे म्हटले आहे की, मसूर प्राथमिक केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. रमेश लोखंडे मसूरसह कोपर्डे हवेली व २३ गावांतील लसीकरणाचे दिवस, मिळणारी लस याची माहिती घेण्याकरिता आम्ही गेलो होतो. त्यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. आम्ही चौकशी करताना मसूरचे उपसरपंच न विचारता आत येऊन बसले. ते कोपर्डे हवेली गावास लस देण्याबाबत बेताल वक्तव्य करू लागले. त्यांना तेथेच समज दिली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमातून कोपर्डे हवेली गावाची आणि प्रहार संघटनेची चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी त्वरित ते थांबवावे, अन्यथा प्रहार स्टाइलने धडा शिकवू. मसूरच्या उपसरपंचांनी पत्रकार परिषद घेण्यापाठीमागे डॉ. रमेश लोखंडे यांचा हात दिसत आहे. संबंधित अधिकारी सामान्य लोकांसाठी काम न करता विशिष्ट वर्गासाठीच काम करीत आहेत.
कोविड काळात जबाबदारी झटकून रजेवर जाणाऱ्या व आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी लोखंडे यांची सखोल चौकशी करून बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेचे शिवाजी चव्हाण यांनी दिला आहे.