कोरोना सेंटरसाठी शेखर गोरेंकडून मंगल कार्यालयाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:36 AM2021-04-26T04:36:39+5:302021-04-26T04:36:39+5:30
म्हसवड : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरअभावी अनेकांना उपचारांविना जीव गमवावा लागत आहे. प्रशासन, आरोग्य यंत्रणा यापुढे हतबल ...
म्हसवड : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरअभावी अनेकांना उपचारांविना जीव गमवावा लागत आहे. प्रशासन, आरोग्य यंत्रणा यापुढे हतबल झाली आहे. यंत्रणेला मदत करण्यासाठी माण-खटावच्या जनतेसाठी शेखर गोरे हे गोंदवले खुर्द येथील सुनीता मंगल कार्यालयात चार-पाच दिवसांत सर्व सोयीनियुक्त कोरोना सेंटर उभारत आहेत.
माण खटाव तालुक्यात कोरोनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. उपचारांविना अनेकांचे जीव जात आहेत. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत युवावर्ग बळी पडताना दिसून येत आहेत. वाढते कोरोनाबाधित अन् त्या पटीत बेड, ऑक्सिजनची संख्या यात मोठी तफावत आहे. सुविधांविना रुग्णांची फरफट सुरू आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात शेखर गोरे यांनी पुढाकार घेत कोरोना सेंटर उभारण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
कोरोना सेंटरसाठी शेख गोरे यांनी गोंदवले खुर्दचे माजी सरपंच अजित पोळ यांच्या मालकीच्या सुनीता मंगल कार्यालयाची जागा निश्चित केली आहे. या जागेची गोरे यांनी रविवारी पाहणी करून सेंटरसाठी यंत्रणा उभी करण्यासाठी नियोजन लावून दिले. त्यामुळे या ठिकाणी चार-पाच दिवसांत सर्वसोयीनियुक्त कोरोना सेंटर सुरू होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणार आहेत.
कोरोनाच्या महामारीत पुन्हा एकदा शेखर गोरे जनतेसाठी धावून आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळत नसताना गोंदवले खुर्द येथे सेंटर सुरू करीत आहेत. हे कोरोना सेंटर सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे. माण खटावच्या जनतेला वेळेवर उपचार होऊन बाधित रुग्ण लवकर कोरोनामुक्त होणार आहेत.
चौकट
कोरोनाच्या जीवघेण्या संकटापुढे प्रशासनासह सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. बेड, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे वाढत्या बाधित रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने अनेकांचे जीव जात आहे. माण खटाव तालुक्यातही कोरोनाचे प्रमाण खूप वाढलेय. या दोन्ही तालुक्यातील जनतेला अशा जीवघेण्या संकटात आधार देण्यासाठी व बाधित रुग्णांवर वेळेवर उपचार होण्यासाठी गोंदवले खुर्द येथे कोरोना सेंटरसाठी जागा पाहिली आहे. या आठवड्यात या ठिकाणी सर्वसोयीनियुक्त कोरोना सेंटर सुरू करीत आहोत.
- शेखरभाऊ गोरे,
शिवसेना
नेते.
फोटो सचिन मंगरुळे यांनी मेल केला आहे.
गोंदवले खुर्द येथे कोरोना सेंटर उभारण्यासाठी शेखर गोरे यांनी रविवारी मंगल कार्यालयाची पाहणी केली. (छाया : सचिन मंगरुळे)