पोलीस महानिरीक्षकांकडून मिरवणूक मार्गाची पाहणी
By admin | Published: September 4, 2014 11:29 PM2014-09-04T23:29:09+5:302014-09-05T00:18:44+5:30
कऱ्हाड : प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना
कऱ्हाड : कोल्हापूर परिक्षेत्राचे विषेश पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी गुरूवारी येथील गणपती विसर्जन मिरवणुक मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या.
यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक अमोल तांबे, प्रांताधिकारी किशोर पवार, पोलीस उपअधिक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलीस निरीक्षक नितीन जगताप, पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने उपस्थित होते. गणपती विसर्जन मिरवणुक सुरळीत पार पडावी, मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नय,े यासाठी पोलीस प्रशासन दक्षता घेत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. तसेच त्यांनी विसर्जन मिरवणुक मार्ग, यशवंतराव चव्हाण समाधी परिसर, प्रीतिसंगम घाट परिसराची पाहणी केली. पाहणीनंतर पुन्हा शहर पोलीस ठाण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. (प्रतिनिधी)
कऱ्हाड येथे गुरूवारी विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी विसर्जन मिरवणुक मार्गाची पाहणी केली. यावेळी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक अमोल तांबे, उपअधिक्षक मितेश घट्टे आदी उपस्थित होते.