झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला, तरी शेतकरी मालामाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:49 AM2021-09-16T04:49:16+5:302021-09-16T04:49:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मागील काही वर्षांत सोयाबीनला चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ ...

Instant soybeans; Whenever it rains, the farmers' goods ... | झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला, तरी शेतकरी मालामाल...

झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला, तरी शेतकरी मालामाल...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मागील काही वर्षांत सोयाबीनला चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ होत आहे. त्याचबरोबर आता कमी कालावधीतही पीक येणारे सोयाबीन वाण आले आहे. त्यामुळे पाऊस कधीही पडला तरी शेतकरी मालामाल होणार आहे. तसेच जिल्ह्यात पाच वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा असतो. यावर्षी हंगामात ऊस वगळून सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख १६ हजार ७०१ हेक्टर होते. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक ६४ हजार हेक्टर, तर सोयाबीनचे ६३७५४ हेक्टर होते. तसेच ज्वारी, भुईमूग, मका या पिकांचेही क्षेत्र राहिले. जिल्ह्यात काही वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढलेले आहे. याला कारण म्हणजे सोयाबीनला मिळणारा चांगला दर. सध्या तर क्विंटलला ९ हजारांपर्यंत भाव येत आहे. त्यातच यावर्षी ७४ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. टक्केवारीत हे प्रमाण ११५ च्या वर आहे.

सोयाबीन पीक घेताना कोणी घरचे बियाणे वापरतो, तर कोणी विकतचे आणतो. तसेच आता नवीन वाणही येत आहे. त्यामुळे कमी कालावधीतही सोयाबीन येऊ लागले आहे.

................................

जिल्ह्यात वाढला सोयाबीन पेरा

वर्ष पेरा (हेक्टरमध्ये)

२०१७ ७३०४४

२०१८ ६३३१४

२०१९ ६००७५

२०२० ७३३९१

२०२१ ७४८३९

.................................................

झटपट येणारे सोयाबीन...

सोयाबीनमध्ये विविध संशोधित वाण बाजारात आले आहे. यामध्ये अर्ली व्हरायटी सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. झटपट हातात येणारे पीक म्हणून याकडे पाहिले जात आहे. ८० ते ९० दिवसांत पीक येते.

...........................

मध्यम कालावधीत येणारे...

अल्पावधीबरोबरच मध्यम कालवधीत येणारे सोयाबीन वाणही आहे. साधारणत: ९० ते १०० दिवसांत हे सोयाबीन पीक येत आहे. जमीन आणि पाण्याची उपलब्धता पाहून याची पेरणी केली जाते.

.................................

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

सोयाबीनमध्ये उशिरा येणारे वाणही उपलब्ध आहे. यामध्ये ११० तसेच १२० दिवसांचे बियाणेही आहे. पण, ऋतूचक्र बदलल्याने याचा वापर कमी होत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

...........................................

शेतकरी म्हणतात...

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतील उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातच कमी कालावधीत पीक येणार असेल, तर त्याकडे शेतकरी वळतो. आता सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे जास्त आहे.

- राजाराम पाटील, शेतकरी

..........................

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. दरामुळे सोयाबीन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. सोयाबीनचा दर टिकून राहिल्यास आणखी क्षेत्र वाढू शकते.

- प्रवीण काळे, शेतकरी

..............................................................

Web Title: Instant soybeans; Whenever it rains, the farmers' goods ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.