पेढ्याचा भैरोबा देवस्थान रस्ता प्रश्न मार्गी लागण्यात आंतरिक समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:40 AM2021-03-31T04:40:26+5:302021-03-31T04:40:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शाहूपुरी येथील पेढ्याचा भैरोबा देवस्थानला प्राचीन परंपरा असून ते जुन्या सातारवासीयांचे श्रद्धास्थान आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शाहूपुरी येथील पेढ्याचा भैरोबा देवस्थानला प्राचीन परंपरा असून ते जुन्या सातारवासीयांचे श्रद्धास्थान आहे. देवस्थानच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात एक आंतरिक समाधान असल्याची भावना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.
पेढ्याचा भैरोबा देवस्थानकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी नगरसेवक अविनाश कदम, भारत भोसले, सी. जे. बागल, राजेंद्र मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा केंडे, नीलम देशमुख, माधवी शेटे, विकास देशमुख, आप्पा गोसावी, राम धुमाळ, दिलीप कडव, पिंटू कडव, महेंद्र गायकवाड, महेश जांभळे, विश्वतेज बालगुडे, बाळासाहेब निकम, राजेंद्र केंड यांची प्रमुख उपस्थिती होती. सातारा शहर व शाहूपुरी परिसरातील अनेक आबालवृद्ध, महिला व भाविक पेढ्याच्या भैरोबाला नित्य स्वरूपात जातात. या सर्वांना विशेषकरून पावसाळ्यात या रस्त्याचा वापर करणे अवघड जात होते.
या कार्यक्रमास हणमंतराव एरगट्टीकर, तात्या जाधव, अरुण बागल, नंदा बागल, माधुरी भोईटे, गणेश वाघमारे, कमलाकर जाधव, राजेंद्र कदम, महादेव खुडे, सादिक आतार, मनोज कडव, अमित कोरडे, राहुल बागल व नागरिक उपस्थित होते.