आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:38 AM2021-05-14T04:38:07+5:302021-05-14T04:38:07+5:30
‘परिचारिकांच्या आदर्श अशा फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. ...
‘परिचारिकांच्या आदर्श अशा फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. वयाच्या ९० वर्षापर्यंत ज्यांनी आपले आयुष्य सतत आणि सतत रुग्णांच्या सेवेत व्यतीत केले, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो.
आपल्या देशात गेल्या वर्षापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.
लाखोंच्या संख्येने लोक बाधित झाले असून, काही लाख लोक या रोगाने मृत्युच्या वाटेला ओढले गेले. या सर्व काळात आजही परिचारिकांचे योगदान सर्वात जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता
व्यक्त करण्याचा निर्णय भारतीय मजदूर संघाने घेतला असून, देशभर परिचारिकांचा सन्मान विविध प्रकारच्या कार्यक्रमातून केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व तालुका रुग्णालये आणि शहरातील रुग्णालयातील पाचशेहून अधिक
परिचारिकांचा आणि त्यांच्यासह खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मदतनीसांचा त्यांना एक पुष्प आणि प्रशस्तीपत्रक देऊन आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील, सर्व तालुक्यातील कार्यकर्ते होते.