Satara: मुनावळेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटन स्थळ उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 12:59 PM2023-11-06T12:59:55+5:302023-11-06T12:59:55+5:30

नियोजित जागेची पाहणी : किल्ले वासोट्याचीही हवाई पाहणी

International standard water tourism site to be set up in Munavle says Chief Minister Eknath Shinde | Satara: मुनावळेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटन स्थळ उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara: मुनावळेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटन स्थळ उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावांतील स्थानिकांना रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मुनावळे पर्यटनस्थळाच्या जागेची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पुरुषोत्तम जाधव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्थानिकांनीही सुरू होत असलेल्या या पर्यटनस्थळाचा आर्थिक उन्नतीसाठी वापर करावा. हे पर्यटनस्थळ विकसित करताना स्थानिकांना त्यामध्ये सामावून घ्यावे. या परिसरात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे कांदाटी खोऱ्यात आणखी पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यातून स्थानिकांना त्यांच्या घराजवळ रोजगार मिळणार आहे. याचा फायदा स्थानिक व येणारे पर्यटक यांनाही होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

अत्याधुनिक सुविधा

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुनावळे येथे स्कूबा डायव्हिंग, बनाना राइड, जेट स्की, हाऊस बोट, बोट क्लब यासह पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत. तसेच, यामध्ये सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे. त्यासाठी निरीक्षण मनोरा, पर्यटकांसाठी चेंजिंग रूम या सोयीही असणार आहेत.

Web Title: International standard water tourism site to be set up in Munavle says Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.