इंटरनेट सेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:38 AM2021-03-18T04:38:39+5:302021-03-18T04:38:39+5:30
अपघाताचा धोका सातारा : सध्या रब्बी हंगामातील सुगी अंतिम टप्प्यात आली असून, ज्वारी उत्पादक पट्ट्यातील कडब्याची ग्रामीण भागात मोठ्या ...
अपघाताचा धोका
सातारा : सध्या रब्बी हंगामातील सुगी अंतिम टप्प्यात आली असून, ज्वारी उत्पादक पट्ट्यातील कडब्याची ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात धोकादायकरीत्या वाहतूक होत आहे. सध्या माण-खटाव तसेच कोरेगाव तालुक्यातील ज्वारीची सुगी पूर्ण झाली आहे. या परिसरातून सातारा तालुक्यासह ऊसपट्ट्यातील शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात कडबा खरेदी केली जात आहे.
एस.टी.ला फटका
सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीपोटी सातारकरांनी एस.टी. प्रवास कमी केला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सध्या विविध मार्गांवर धावणाऱ्या एस.टी. बसेसच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे. तसेच लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या बसेसच्या फेऱ्याही कमी केल्या आहेत.
पथदिव्याची मागणी
सातारा : गोडोली परिसरातील साईमंदिर झोपडपट्टी, मोरे कॉलनी, यशवंत कॉलनी, बॉम्बे रेस्टॉरंट ते अजंठा चौक परिसर, ठक्कर सिटी या भागात पथदिवे बसवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने अनेक भागात सर्व मूलभूत सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
पथदिव्यांची मागणी
सातारा : गोडोली परिसरातील साईमंदिर झोपडपट्टी, मोरे कॉलनी, यशवंत कॉलनी, बॉम्बे रेस्टॉरंट ते अजंठा चौक परिसर, ठक्कर सिटी या भागांत पथदिवे बसवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने अनेक भागांत सर्व मूलभूत सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
सुरक्षितता धोक्यात
सातारा : स्टंटबाज वाहनचालकांच्या नाना कसरती धोकादायक ठरत असतात. या स्टंटबाजांना कोणीतरी आवरा असे म्हणण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील कण्हेर व परिसरातही असेच प्रकार समोर आले आहे. बहुतांश दुचाकीस्वार मोबाईलवर बोलत वाहने चालवत आहेत.
शहरातील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी
सातारा : सातारा शहरातील विविध चौकांतील सिग्नल यंत्रणा पूर्ववत कार्यान्वित करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. ग्रेड सेपरेटरचे काम सुरू झाल्यापासून शहरातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यात आले होते. अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा ताण येत आहे. शहरातील सर्व सिग्नल यंत्रणा बंदच आहेत. सद्य:स्थितीत ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
रुंदीकरणाचे काम संथ
सातारा : विटा-महाबळेश्वर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे केळघर घाटातील काम गेल्या दीड वर्षापासून संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना बसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या कामाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार होत आहे.
उत्पादकांचे नुकसान
सातारा : यंदा गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. या हंगामातही कारखानदारांनी आपला मनमानी कारभार सुरूच ठेवल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या अनेक पतसंस्था व सोसायट्यांच्या निवडणुकीमध्ये विरोधी गटाला त्रास देण्यासाठी कारखान्यांनी तोडीला नकार दिला.
एटीएम मशीन बंद
सातारा : शहरातील महाविद्यालय परिसरातील काही एटीएम वारंवार बंद राहत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. एक वर्षानंतर महाविद्यालये सुरू झाली असून, परीक्षा फाॅर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे. तसेच विद्यार्थ्यांना पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्यापेक्षा जवळच्या एटीएममध्ये जाणे सोपे आहे.
रस्त्यावर गटारगंगा
सातारा : नगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गोडोली साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय रोडवर भद्रकाली दुकानासमोर गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हे दुखणे वर्षानुवर्षे कायम असून, स्थानिक वैतागले आहेत.
बैलबाजाराला स्थगिती
सातारा : जावळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मेढा व आनेवाडी येथे जनावरांचा वार्षिक बैलबाजार होळीपासून आयोजिला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी बैलबाजार भरविण्यात येणार नसल्याची माहिती कृषी बाजार उत्पन्न समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकद्वारे दिली आहे.