करून दाखवतो.. एकदा संधी द्या; सातारा जिल्ह्यातील ३२ इच्छुकांनी शरद पवार यांना घातली उमेदवारीसाठी गळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 12:20 PM2024-10-09T12:20:19+5:302024-10-09T12:20:48+5:30

उशिरापर्यंत मुलाखती सुरू

Interviews of 32 aspirant candidates of NCP Sharad Chandra Pawar party in Satara district for Legislative Assembly | करून दाखवतो.. एकदा संधी द्या; सातारा जिल्ह्यातील ३२ इच्छुकांनी शरद पवार यांना घातली उमेदवारीसाठी गळ 

करून दाखवतो.. एकदा संधी द्या; सातारा जिल्ह्यातील ३२ इच्छुकांनी शरद पवार यांना घातली उमेदवारीसाठी गळ 

सातारा : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ३२ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी (दि. ८) पुणे येथे खुद्द पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतल्या. खासदार पवार यांनी इच्छुकांचा अजेंडा, जाहीरनामा जाणून घेतला. यावेळी आम्ही अनेक वर्षांपासून मतदारसंघात तयारी करत असून, एकदा संधी द्या. माझ्या रूपाने एक आमदार नक्की आपल्याला मिळेल, असा विश्वास देत इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली.

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामार्फत विधानसभा निवडणुकीकरिता ३२ इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. त्यानुसार फलटणमधून राजेंद्र पाटोळे, अभय वाघमारे, लक्ष्मण बापूराव माने, अमोल आवळे, दिगंबर आगवणे, वैभव पवार, रमेश आढाव, बुवासाहेब हुंबरे, राजेंद्र काकडे, प्रा. डॉ. बाळासाहेब कांबळे, अनिल जगताप, घनश्याम सरगर, बापूसाहेब जगताप, नंदकुमार मोरे, सूर्यकांत शिंदे, आशिष सरगर, वाईतून दत्तात्रय ढमाळ, अनिल बुवासाहेब जगताप, डॉ. नितीन सावंत, रमेश धायगुडे पाटील, कैलास जमदाडे, यशराज मोहन भाेसले, नीलेश डेरे, 

माण-खटावमधून सूर्यकांत राऊत, नितीन देशमुख, प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे, अभयसिंह जगताप, अनिल देसाई, सातारा-जावलीसाठी सातारा-जावली मतदारसंघातून शफिक कासम शेख, दीपक पवार, अमित कदम, तर कोरेगावातून आमदार शशिकांत शिंदे, कऱ्हाड उत्तरमधून आमदार बाळासाहेब पाटील, कऱ्हाड दक्षिणसाठी सविनय कांबळे आणि पाटणसाठी सत्यजित पाटणकर अशा ३६ जणांनी मुलाखती दिल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील उपस्थित होते.

शरद पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

इच्छुकांनी आपल्या मतदार संघाची बारीक-सारीक अद्ययावत माहिती घेऊन ठेवली होती. या मुलाखती पार पडल्यानंतर आता यावर पक्ष आणि पक्षाचे नेते शरद पवार काय निर्णय घेणार याची उत्सुकता उमेदवारांना लागली आहे.

Web Title: Interviews of 32 aspirant candidates of NCP Sharad Chandra Pawar party in Satara district for Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.