‘भूमाता’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ठिय्या’-मुद्रा कर्ज योजना न राबविणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:40 AM2019-01-24T00:40:58+5:302019-01-24T00:43:40+5:30
पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना न राबविणाºया जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांची चौकशी करावी, म्हसवड मुख्याधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीने
सातारा : पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना न राबविणाºया जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांची चौकशी करावी, म्हसवड मुख्याधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, म्हसवड येथील आकाश देवकर याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानंतर आई-वडिलांना आर्थिक मदत मिळण्यासाठी म्हसवड मुख्याधिकाºयांना दोनवेळा निवेदन दिले. संबंधित अधिकाºयाने बघ्याची भूमिका घेत त्यास केराची टोपली दाखविली.
अशा मुख्याधिकाºयांची म्हसवडला आल्यापासूनची पारदर्शकपणे चौकशी करावी, कºहाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या खोट्या खंडणीच्या गुन्ह्याची सीबीआयमार्फत चौकशी करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.या आंदोलनात भूमाता ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजकुमार डोंबे, विजय कांबळे, मोहन देवकर, माधुरी टोणपे, शकुंतला कांबिरे, कल्पना चव्हाण, रेखा सूर्यवंशी, सुमन फाळके आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमाता ब्रिगेडचे राजकुमार डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.